महापालिकेच्या 43 एकर जागेवर होणार वृक्षलागवड 

0
30
गटनेते आनंद चंदनशिवे व मनपा अधिकारी यांनी केली पाहणी
प्रिसिजन समुहाचे प्रमुख यतिन शहा यांनीही दिली भेट
जनसत्य : प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा अभियांन अंतर्गत बाळे हद्दवाढ भागातील केगाव लगत शिवाजी नगर येथील मनपाच्या 43 एकर जागेवर 20 हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी गटनेते आनंद चंदनशिवे, प्रिसिजन समुहाचे प्रमुख यतिन शहा, उद्योजक व निसर्गप्रेमी प्रल्हाद काशिद, उपायुक्त धनराज पांडे यांनी पाहणी केली.
      यासाठी सदस्य गणेश पुजारी, नगसेविका ज्योती बमगोंडे यांच्या भांडवली कामे निधीतून 15 लाख रुपये निधी वर्ग केला. तसेच मुख्य कार्यालयाकडील बाग देखभाल दुरुस्ती या हेडकडून 25 लाख रुपयाची मागणी म.न.पा मा.आयुक्त यांना केली. या संदर्भात म.न.पाचे आयुक्त, नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी व ज्योती बमगोंडे, उपायुक्त धनराज पांडे यांची 23 जुलै रोजी संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये मनपाच्या 43 एकर च्या जागेवर अज्ञात लोकानी मुरुम व माती उपसा केला आहे. आजुबाजुच्या जागेवर अतिक्रमण करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 43 एकर पडिक असलेल्या जागेवर वृक्ष लागवड करावी. सदरील जागेवर वॉल कंपाँड व कायम स्वरुपी रखवालदार नेमावा. यामुळे मनपाची आरक्षित जागा सुरक्षित राहील. या कामासाठी मदतीचे आव्हान केले. यावेळी काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, सदस्य विनोद भोसले, सदस्या वैष्णवी करगुळे यांनी त्यांच्या भांडवली निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले.
      यावेळी गणेश पुजारी, विजय बमगोंडे, नगरअभियंता संदिप कारंजे, अनिल जैन, केतन होरा, सहा. आयुक्त विक्रम पाटील, मुख्य सफाई अधिक्षक अधिकारी नागेश मेंडगुळे, पाणी पुरवठा अधिकारी चौबे, इंजिनिअर मुजावर, संदेश इंगळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here