यास्मीन शेख यांना एच.डी. पदवी प्रदान

ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर : सोशल महाविद्यालय सोलापूर पीएच.डी. रिसर्च सेंटरची विद्यार्थिनी यास्मीन याकुब शेख यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर  या  विद्यापीठातून  उर्दू विषयातून पीएच.डी. पदवी पूर्ण केली. त्यांनी आपल्या शोध निबंध सोलापूर सोशल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व ज्येष्ठ कवि एजाज कारीगर यांच्या उर्दू साहित्यातील योगदान आहे त्यामुळे त्यांनी ‘एजाज नबी कारीगर अपने हमअसर शोअरा के तनाजूरमे’ हा विषय निवडला होता.रिसर्च गाईड म्हणून सोशल महाविद्यालयाचे डॉक्टर गौस अहमद शेख यांनी मार्गदर्शन केले या निमित्ताने सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इ.जा तांबोळी, पर्यवेक्षक प्रा. जैनुद्दीन पटेल यांनी यास्मिन शेख यांचे  अभिनंदन केले व पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला व या प्रसंगी ॲड. याकुब शेख ,शहानवाज शेख, मैनुद्दिन आत्तार उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *