Whatsapp वर आलेली ही लिंक चुकूनसुद्धा क्लिक करू नका; शासनाने दिला इशारा

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात देशात बँकिंग फसवणुकीचे (Hacking) प्रकार सतत वाढत आहे. त्या काळात इंटरनेट आणि व्हॉट्सॲपचा (whatsapp) वाढता वापर हे त्याचं एक मोठं कारण आहे. खरं तर कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोक घरातूनच ऑफिसचं काम करत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना इंटरनेट आणि व्हॉट्सॲपचा जास्त वापर करणं क्रमप्राप्त आहे. याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार (Cyber crime) घेत आहेत. त्यातल्याच एका फसव्या मेसेजबद्दल सरकारने सर्व यूजर्सना सावध राहायला सांगितलं आहे.

Whatsapp वर एक मेसेज आजकाल फिरत आहेत. ज्यामध्ये कोरोना साथीच्या रोग्यांसाठी फंड गोळा करत असल्याचा दावा केला जात आहे. तुम्हाला अशी मदत द्यायची किंवा मिळवायची असेल लिंकवर क्लिक करा, असं म्हणून एक Link देण्यात  येत आहे. जर तुम्हाला असाच संदेश मिळाला तर तुम्ही सावधगिरी बाळगावी, असं शासनाने सांगितलं आहे. कारण जर तुम्ही त्या लिंक वर क्लिक केलं तर तुमची सर्व माहिती त्या सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा ते गैरफायदा घेऊ शकतात. हे कसं टाळायचं ते जाणून घ्या.

सायबर गुन्हेगार कसा पाठवतात मेसेज

सरकारने दिलेला इशाऱ्यात असं सांगितलं आहे की, सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवत आहेत. ज्यामध्ये सरकारकडून कोरोना रोगासाठी मदत निधी देण्याची चर्चा आहे. आणि त्यासाठी एक मेसेज लिंक सोबत पाठवला जातो. त्या लिंक वर जाऊन माहिती भरायला सांगितले जाते आणि ही आपली वैयक्तिक माहिती  सायबर गुन्हेगारांन पर्यंत पोहोचते म्हणूनच या अशा लिंक ला ओपन करून सायबर फसवणुकीला बळी पडू नका.

शासनाने दिला सतर्कतेचा इशारा

याबाबत पीआयबी फॅक्ट चेक ट्विटर हँडलवरून सरकारकडून माहिती देण्यात आलेली आहे. ट्विटमध्ये असा कोणताही मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे सांगण्यात आले आहे. covid-19 संदर्भात कोणताही निधी जाहीर केलेला नाही. असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. हे मेसेज चुकूनही कोणाला पाठवू नका असे ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्याशिवाय अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा मेसेज मुळे तुमचा फोन हॅक होऊ शकतो. असा इशारा सरकारने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *