आता कोरोनापेक्षाही भयंकर D614G व्हायरसची झाली एण्ट्री! 10 पट जास्त वेगानं पसरण्याची भीती

ताज्या घडामोडी देशविदेश

क्वालालंपूर : जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आता मलेशियात कोरोनाव्हायरसचा नवा प्रकार समोर आला आहे. तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस कोरोनापेक्षा 10 पट जास्त धोकादायक आहे. असा विश्वास आहे की चीनमधील वुहानमध्ये आढळणाऱ्या कोव्हिड-19 पेक्षा हा नवा व्हायरस जास्त धोकादायक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हायरस प्रथम भारतीय वंशाच्या रेस्टॉरंट मालकामध्ये आढळला.

मलेशियामध्ये D614G व्हायरसची 3 प्रकरणं समोर आली आहेत 45 लोकांच्या चौकशीत ही नवीन प्रकरणे उघडकीस आली. हा व्हायरस प्रथम भारतीय वंशाच्या रेस्टॉरंट मालकामध्ये आढळला. जे भारतातून परत आले. दरम्यान, या व्यक्तीला 14 दिवसांच्या क्वारंटाइनचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वैद्यकीय संशोधन संस्थाला (IME) D6140 प्रकारचा व्हायरस सापडला आहे. हा व्हायरस सिवागंगा क्लस्टर मलेशियामध्ये सापडला आहे. आरोग्य महासंचालक डाटुक डॉ. नूर हिशम अब्दुल्ला यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. ते म्हणाले की D614G म्यूटेशन पहिल्यांदा जुलैमध्ये आढळून आला. हा व्हायरस इतका खतरनाक आहे की, यामुळे जगभरातील सर्व लशीचे काम वाया जाऊ शकते. या व्हायरसला एक सुपर स्प्रेडर मानले जाते. यामध्ये 10 पटीने अधिक वेगाने इतर व्यक्तींना संक्रमित करण्याची क्षमता आहे. आतापर्यंत, विविध सार्वजनिक आरोग्य नियंत्रणे प्रयत्नांद्वारे नियंत्रित आहेत.

काय आहे D614G व्हायरस?

D614G व्हायरसला G म्यूटेशन असेही म्हटले जाते. याचे पहिले प्रकरण प्रथम जानेवारीमध्ये दिसून आले आणि त्यानंतर चिंता वाढली आहे. हा व्हायरसने मूळ “L” आणि “S” या रूपांना जन्म दिला आहे. हे श्वसनमार्गामध्ये अधिक व्हायरल प्रती तयार करते आणि एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे अधिक कार्यक्षमतेने पसरते. जनतेने जागरुक राहून सावध राहिले पाहिजे, असे आरोग्य महासंचालकांनी सांगितले. कारण मलेशियामध्ये कोव्हिड -19 सह आढळून आलेला D614G व्हायरस सामान्य व्हायरस नाही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *