मुलगी बघायला गेले आणी लग्नच ऊरकुन आले !

सामाजिक सोलापूर

 

मोहोळ,(तालुका प्रतिनिधी):
मोहोळ येथील दलित स्वयंसेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष मिलींद अष्टुळ यांनी स्वताचा मुलगा रविकांत यांस अरण (ता.माढा) येथील धनंजय खंडाळे यांची मुलगी पाहण्यासाठी सहकुंटुंब गेल्यानंतर तिथे मुलगा व मुलगी यांची एकमेंकाना पसंती होताच मुलीच्या  आई वडीलाच्या सल्ल्याने इतर सर्वच सोपस्कारांना फाटा देत लग्न करण्याचा निर्णय घेत मुलाचे लग्नच उरकून सुनेला घरी घेऊन आल्याची घटना घडली.

     याबाबत अधिक माहिती अशी की मिलिंद अष्टुळ हे इलेक्ट्रीक इंजिनियर कॉन्ट्रक्टर असुन त्यांची पत्नी सुरेखा अष्टुळ या प्राथमिक शाळेत शिक्षीका आहे.या उभयतांचा एकुलता एक मुलगा रविकांत हाही इलेक्ट्रीक  इंजिनियर आहे तर मुलगीही सुर्यकांता ही बी एस्स सी च्या दुसऱ्या वर्षाला आहे.मुलगा रविकांत यांस अरण (ता.माढा) येथील केमच्या माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असलेल्या धनंजय खंडाळे  यांची  गायत्री या इलेक्ट्रीक इंजिनियर असलेल्या  मुलीचे स्थळ आले होते.मुलीकडील मंडळी मोहोळला येऊन पाहुणे व घरदार पाहुन गेले होते.
रविवार दि.१६ रोजी मिलींद अष्टुळ हे अरण येथे मुलगी पाहण्यासाठी सहकुंटुब गेल्यानंतर त्याठिकाणी मुला मुलींची एकमेकांची पसंती होताच साखरपुडा करण्याचा मनोदय उपस्थितापैकी काहीनी व्यक्त केला.पंरतु यावेळी मुलाच्या वडीलांनी जर सर्वच गोष्टी एकमेकांना पसंत आहेत. तर अडचण नाही,असे म्हणत आजच लग्न उरकून घेऊ असा विचार बोलुन दाखविला.तेव्हा मुलींच्या आई वडीलांनाही हा निर्णय योग्य वाटला व तात्काळ दोन्हीही बाजुने काही मोजक्या पाहुण्यांना व मित्र, मैत्रणींना हा निर्णय कळवित दुपारीच लग्न उरकून घेत आहोत,अशी माहीती देत हिंदु परंपरेने लग्नविधी उरकुन घेतला.
 या लग्न विधीसाठी निरोप कळताच वधु वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी मोहोळचे नगराध्यक्ष शौकत तलफदार, माजी नगराध्यक्ष व ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बारसकर , जि .प. चे माजी समाजकल्याण  सभापती , सदस्य शिवाजी कांबळे,यशवंत भारत शिंदे ,  राजाभाऊ सुतार  या प्रमुख अतिथीसह मोजकेच लोक उपस्थित होते .  कोरोनाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर पुरोगामी चळवळीत कार्य करीत असणाऱ्या  मिलींद अष्टुळ यांनी एकुलत्या एक मुलाचा शुभविवाह अतिशय थाटामाटाने, गाजावाजा न करता  पार पाडल्यामुळे ”  मुलगी बघायला गेले , व लग्नच उरकुन आले “। असे म्हणत या घटनेची सकारात्मक चर्चा सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *