ठरलं..! वरूण धवन-नताशा दलाल 24 जानेवारीला अडकणार विवाहबंधनात, काका अनिल धवन यांची माहिती

ताज्या घडामोडी मनोरंजन मुंबई

मुंबई : वरुण धवन आणि नताशा दलाल (natasha dalal) यांच्या रिलेशनशिपबाबत नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. मागील बऱ्याच काळापासून ही जोडी रिलेशनशिपमध्ये आहे. आता त्यांच्या याच खास नात्यात लग्नाचं वळणही आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर वरूणचे काका आणि अभिनेता अनिल धवन यांनी वरूण आणि नताशा 24 जानेवारीला लग्न करणार असल्याची माहिती दिली.

अभिनेता अनिल धवन म्हणाले, गेल्या कित्येक दिवसांपासून मी वरूणच्या मागे लागलो होतो. लवकर नताशाला धवन कुटुंबांची सून म्हणून घेऊन ये. अखेर वरुण लग्नाला तयार झाला असून 24 जानेवारीला हे दोघे अलिबागला लग्नगाठ बांधणार आहे. मी आणि माझे कुटुंब वरूणसाठी खूश आहोत.

सूत्रांच्या माहितीनुसार अलिबागमधील पंचतारांकित हॉटेलची बुकींग झाल्याचीही माहिती आहे. खुद्द वरुण धवन यानंच लग्नासाठीच्या या ठिकाणाची पाहणी केल्याचंही म्हटलं जात आहे. त्याच्या विवाहसोहळ्यासाठी 200 पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. अॅडव्हान्स बुकींगपासूनचे सर्व व्यवहारही पूर्ण झाले आहेत.

मागील बऱ्याच काळापासून नताशा आणि वरुण रिलेशनशिपमध्ये आहेत. मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्येच ते विवाहबंधनात अडकले जाणार असल्याची चर्चा होती. पण, कोरोनाच्या संकटामुळं हे शक्य होऊ शकलं नाही. पण, आता मात्र खऱ्या अर्थानं ही जोडी नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात सज्ज झाली आहे हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *