बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणीबार्शीतील वैभव वाईन शॉप विरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी सोलापूर

३२ हजाराचा मुद्देमाल जप्त दैनिक जनसत्यच्या बातमीवर शिक्कामोर्तब

बार्शी जनसत्य प्रतिनिधी

बेकायदेशीररित्या दारु विक्री प्रकरणी बार्शीतील वैभव वाईन शॉपचे मालक चंद्रकांत रमाकांत पिसे या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून एका मोटारसायकल सह बत्तीस हजराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली आहेसविस्तर माहिती अशी की सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पथकाचे एएससाय घोळवे,काशीद,पोहेकॉ कारटकर,फिर्यादी दिलीप राऊत  हे  माला विषयी आरोपी शोध कामी आणि अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी  बार्शीत पेट्रोलिंग करत असताना दि ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास शहरातील पोष्ट चौकात एक इसम पांढरे रंगाचे ऍक्टिव्हा मोटारसायकलवरून दोन्ही पायाच्या मध्ये खाकी बॉक्स घेऊन पोष्ट चौकातून सोलापूर रोडकडे जात असताना दिसला पोलिसांनी त्यास हात करून जागीच थांबविले आणि नाव विचारले असता त्याने अशोक शिवाजी लष्कर वय १९ रा संभाजी नगर रेल्वे स्टेशन रोड बार्शी असे सांगितले त्याच्या जवळील बॉक्स उघडून बघितला असता त्यामध्ये लंडन स्पिनर कंपनीच्या १७४० रुपये किमतीच्या १२ बियरच्या बाटल्या मिळून आल्या तसेच सदर बाटल्या वाहतूक बाबतीत परवाना नसल्याचे सांगितले आणि या बाटल्या पिसे यांच्या वैभव वाईन शॉप मधून आणल्या असल्याचेही सांगितले पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेऊन दारू आणि एम एच १३ सी एक्स ३६६९ मोटारसायकल जप्त केली आहे याप्रकरणी  पोहेकॉ राऊत यांच्या फिर्यादीवरून चंद्रकांत पिसे आणि अशोक लष्कर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेबार्शीतील वाईन शॉप मधून होणाऱ्या बेकायदेशीर आणि ठोक दारू विक्री बाबत चार दिवसांपूर्वी दैनिक जनसत्य ने वस्तुनिष्ठ वृत्त प्रकाशित केले होते त्या वृत्ताला आज दुजोरा मिळाला आहेकेवळ वाईन शॉप मधून होणाऱ्या बेकायदेशीर आणि मोठ्या प्रमाणात दारू विक्रीमुळेच शहरात अवैद्य दारू फोफावली आहे तरी अशा वाईन शॉप ची तपासणी आणि चौकशी करावी सदर सर्व वाईन शॉप मधून दररोज किती दारू  कोणत्या ग्राहकांनी खरेदी केली आहे तसेच आजपर्यंत विविध कारवाई मध्ये जप्त दारू कोणत्या वाईन शॉप मधून विक्री केली आहे त्याची चौकशी करून अशा दोषी वाईन शॉप चा परवाना निलंबित करण्यात यावा अशी मागणी होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *