5 लाखांसाठी आईने मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लावून दिलं लग्न

ताज्या घडामोडी देशविदेश

पानीपत, 23 सप्टेंबर : हरियाणातून एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. येथे काही पैशांच्या हव्यासापोटी एका आईने आपल्या 17 वर्षांच्या मुलाला 40 वर्षीय व्यक्तीला विकलं आहे. काही दिवसांपूर्वी एका बापाने गर्भवती पत्नीला मुलगा आहे की मुलगी हे पाहण्यासाठी तिचं पोट फाडलं होतं. त्यानंतर ही घटना समोर आली आहे. स्त्री-पुरुष समानतेला महत्त्व देणाऱ्या आपल्या देशात अद्यापही या घटना घडतात. कायद्याने अल्पवयीन मुलांचे लग्न लावून देणे गुन्हा आहे, शिवाय काही पैशांसाठी या आईने आपल्या 17 वर्षीय मुलीचं लग्न तब्बल 40 वर्षीय माणसासोबत लावून दिले. चाइल्ड लाइनला याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने मुलीला रेस्क्यू केलं आहे.

बाल कल्याण समितीच्या संचालकांच्या तक्रारीनंतर रोहतकमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार किशोरीला गावातील एका व्यक्तीने तिच्या आईकडून काही पैशांमध्ये विकत घेतलं. आणि तिचं लग्न गावातील 40 वर्षीय विक्रम याच्यासोबत लावून दिलं. पीडितेने कसंबंस करीत चाइल्ड लाइनला याबाबत माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार बाल कल्याण समिती रोहतक यांच्याजवळ पोहोचला. तातडीने बाल कल्याणची टीम गावात पोहोचली. त्यांनी किशोरीचा तपास केला. तेव्हा समोर आले की किशोरीची खरेदी-विक्री करण्यात आली होती. यासोबतच 12 वर्षाच्या एका मुलीलाही आणण्यात आलं होतं. टीमने किशोरीला रेस्क्यू करीत तिला बालिकाश्रमात पाठवलं आहे.दोन्ही मुलींनी सांगितले की, विक्रम आपल्या कुटुंबातील दोन सदस्यांसह यमुनानगरमध्ये आला होता. येथे किशोरीच्या कुटुंबीयांनी झासू नावाच्या व्यक्तीकडून 5 लाख 60 हजार रुपये घेतले. ज्यानंतर किशोरीला तिच्या मैत्रिणीच्या 12 वर्षीय बहिणीसोबत रोहतक पाठविण्यात आलं. येथे एका मंदिरात विक्रमने किशोरीसोबत लग्न केलं. किशोरीला हे लग्न करायचं नव्हतं. मात्र लोकांनी दबाव आणत तिला हे लग्न करायला भाग पाडलं. सध्या या दोन्ही मुलींना रेस्क्यू करण्यात आलं असून त्यांना बालिकाश्रमात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात किशोरीची आई, विक्रम, झासू यांच्यावर केस दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *