UPSC 2019 Result अंतिम परीक्षेत महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधरावी

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : UPSC 2019 च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात प्रदीप सिंह देशात पहिला आला आहे. UPSC civil Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून 829 महत्त्वाकांक्षी युवक युवती निवडले गेले आहेत.

जतीन किशोर आण प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या रँकवर आहे. अभिषेक सराफ आठव्या रँकवर आहे.UPSC 2019 चा निकाल www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

UPSCने सप्टेंबर 2019 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवांच्या लेखी परीक्षेच्या निकालांच्या आधारे आणि फेब्रुवारी-ऑगस्ट 2020 मध्ये घेण्यात आलेल्या वैयक्तिक मुलाखतीवर आधारित निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे.

यंदा या परीक्षेस एकूण 829 उमेदवांनी उमेदवारांची निवड झाली आहे. दरवर्षी, लाखो उमेदवार ज्यांना आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा असलेले तरुण-तरुणी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात. ही परीक्षा देशातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षा मानली जाते. यंदा या निवड झालेल्या उमेदवारांपैकी 304 जनरल कॅटेगिरीतील, 78 EWS, 251 ओबीसी, 129 अनुसूचित जाती आणि 67 अनुसूचित जमाती कॅटेगिरीतील आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या सेवा परीक्षेतून IAS, IPS आणि IFC, भारतीय टपाल सेवा, भारतीय टपाल सेवा, यूपीएससी नागरी सेवांद्वारे भारतीय व्यापार सेवा यासह इतर सेवांसाठी निवड केली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. यात प्रारंभिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात. मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *