UPSC: पंढरपूर तालुक्यातून , एकाच दमात झाले IAS आणि IPS अधिकारी

ताज्या घडामोडी सोलापूर

पंढरपूर : UPSCच्या परिक्षेत पंढरपूर तालुक्याने बाजी मारली आहे. एकाच वेळी तालुक्यातून दोन तरुण अधिकारी झाले आहेत. एकाची IPS तर दुसऱ्याची IAS मध्ये निवड झाली आहे. त्यामुळे तालुक्यातले दोन तरुणांना एकाचवेळी प्रशासनात उच्च पदावर जाण्याचा मान मिळाला आहे. घरंदाज पण पारंपरिक शेतकरी कुटुंबात राहून देखील एका उच्च ध्येयाने प्रेरित होवून पंढरपूर तालुक्यातील  कासेगाव  येथील शेतकरी पुत्र  अभयसिंह बाळासाहेब देशमुख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे.

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर IPSमध्ये यश मिळवलं आहे. अभयसिंहला 153वा रँक मिळला. पंढपुरच्या परगण्याचा देशमुख यांच्याकडे सर्व कारभार होता त्यामुळे सरकारी राबता कुटुंबातील सदस्यांनी बघितला आहे.आता अभयसिंहांमुळे परत एकदा देशमुखी बाज बघायला मिळणार अशी भावना कुटुंबीयांची आहे.

लहानपणापासूनच डॉक्टर बनायचे स्वप्न होते, पण आयपीएस झालो. लोकांची सेवा करण्याबरोबरच पीडितांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे अभयसिंह देशमुख यांनी सांगितले.

आज केंद्रीय लोकसेवा आय़ोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये अभियसिंह देशमुख यांची IPS तर राहुल लक्ष्मण चव्हाण याची IAS म्हणून निवड झाली आहे.

राहुल लक्ष्मण चव्हाण याने 109 वा क्रमांक मिळवून खर्डी, पंढरपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. राहुल यांचे प्राथमिक शिक्षण निकमवस्ती खर्डी तर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण सिताराम महाराज विद्यालय खर्डी आणि सातवी ते दहावी कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले.

आई-वडील शेतकरी असताना देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राहूल याने पुणे येथील वाडिया कॉलेजमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला पण शारीरिक तंदुरुस्ती नसल्याने आणि थोड्या तांत्रिक अडचणीमुळे त्याने बारावीनंतर कला शाखेमध्ये पुणे येथे प्रवेश घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *