मुंबई : ‘हवेमुळे कोरोनाचा विषाणू वाढत आहे. प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेवर बंदी आणता येईल. पण, फटाकेवर बंदी घालण्यापेक्षा तुम्हीच जबाबदारी घ्यावी, फटाके न फोडण्याचा जनतेनं संकल्प करावा आणि प्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याचे टाळावे, असं आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात फटाके फोडण्यावर बंदी घालण्यास नकार दिला आहे.
राज्यात आता उद्योग धंदे हे पूर्वपदावर येत आहे. सर्वत्र गर्दी ही वाढत चालली आहे. सर्व व्यवहार हे पूर्वपदावर येत आहे. पण, खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या काळात आपल्याकडून परिस्थिती ही अनियंत्रित होत असल्याची टीका झाली. पण, सर्वांनी धैर्याने सामना केला आणि आता त्याचा आलेख हा कमी झाला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
‘गेल्या सात महिन्यांपासून लढा देऊन परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे चार दिवसांच्या धुरात हे वाहून जाता कामा नये, प्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याचे टाळा, शक्यतो फटाके फोडूच नये. फटाके फोडले नाही तर उत्तमच आहे. दिवाळीतील चार महिने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. फटाकेवर बंदी आणली जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेऊन फटाके फोडू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.
‘स्पॅनिश फ्लू आला होता. त्यावेळी अनेक वर्ष त्याने थैमान घातले होते. त्यामुळे कोट्यवधी लोकांचा बळी गेला होता. त्यामुळे सतर्क राहावे लागणार आहे. जरी आपण सर्व गोष्टी उघडत आहोत. पण गती देत असताना अधोगती होऊ द्यायची नाही. जर पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ आली तर ते अत्यंत महागात पडणारे आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला