Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य,लॉकडाऊन करावा लागेल

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनसंबंधी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

राज्यात लसीकरण वेगाने वाढवलं जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावं लागेल. जिथे आवश्यक आहे तिथे कडक लॉकडाऊन करावं लागेल. नागरिकांना विनंती आहे की लसीकरण करुन घ्या. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळा आणि मास्क वापर करावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *