शेतकरी-कामगारांचं हित जोपासणार: मुख्यमंत्री ठाकरे

ताज्या घडामोडी महाराष्ट्र मुंबई

मुंबई : खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल तसंच सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांच हित जोपासलं जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी मंत्रालयात आपलं मनोगत व्यक्त केलं.  यावेळी विशेष आमंत्रित काही कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी राज्य मंत्री दीपक केसरकर ही उपस्थित होते.

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गावोगावी आणि दुर्गम भागापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा दिल्या जातील. तसंच कामगारांचे हित जोपासण्यास प्राधान्य दिलं जाईल असं ते म्हणाले.

कोविड योद्धे खरे स्वातंत्र्य योद्धे
कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स,नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत,आपल्यासाठी स्वातंत्र्य योद्धे आहेत. या काळातही न डगमगता ते समर्पित भावनेने सेवा देत आहेत. कोरोनातून बरे झालेले नागरिकही लढवय्ये आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पोलीस /जवानांची कामगिरी
कोरोनाच्या कालावधीत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आपले काम चोखपणे बजावले. पण हे करताना काही पोलिस अधिकारी व कर्मचारी ही कोरोनाला बळी पडले. त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना देखील त्यांनी अभिवादन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याला शाळा सुरू करता नाही आल्या. पण आपण राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील याची काळजी घेतली. ऑनलाइन शिक्षण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्यात आज घडीला अंदाजे 60 हजार उद्योग सुरू झाले आहेत. 16 लाखांहून अधिक कामगार आणि कर्मचारी वर्ग कामावर परतला आहे. स्थानिकांना मराठी माणसाला रोजगार मिळावा म्हणून शासनाने ‘महा जॉब्ज’ पोर्टल सुरू केले. मोबाईल ॲपही सुरू झाले आहे. सर्वसामान्यांना घरे मिळावीत यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू करणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *