UAEमध्ये राहणाऱ्या भारतीयाला लागला जॅकपॉट, एका रात्रीत झाला कोट्यधीश!

ताज्या घडामोडी देशविदेश

शारजाह : कधी कुणाचं नशीब उघडेल काही सांगता येत नाही. कोरोनाचं संकट जगावर असतांना सगळ्यांनाच आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र संयुक्त अरब अमिरातीत राहणाऱ्या एका भारतीयाचं  आयुष्यच बदलून गेलं आहे. शारजाहमध्ये राहणारे गुरुप्रित सिंह असं या भाग्यवान व्यक्तीचं नाव असून सिंह हे एकात्रीत कोट्यधीश झाले आहेत. त्यांना एक जॅकपॉट लागल्याने त्याचं अनेक दिवसांचं स्वप्न पूर्ण झालं. खलिज टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

गुरुप्रित सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक लॉटरीचं तिकीट काढलं होतं. गेली अनेक वर्ष ते असं तिकीट काढतात. मात्र यावेळी त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. रात्री त्यांना त्या लॉटरीच्या ऑफिसमधून फोन आला आणि तुम्हाला जॅकपॉट लागला आहे असं त्यांनी सांगितलं.

आपली कुणी तरी गंम्मत करत आहे असंच सिंह यांना वाटतं. नंतर मात्र त्यांची खात्री पटली. त्यांनी 12 ऑगस्टला  067757 या क्रमांकाचं तिकीट काढलं होतं. त्यात त्यांना 10 मिलियन दिरहम म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 20 कोटींच्या आसपास रक्कमेचं बक्षिस लागलं आहे.

मुळचे पंजाबचे असंलेले सिंह हे शारजाहमध्ये एका आयटी कंपनीत मॅनेजर आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात आपल्याला असं काही मिळेल याचं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं.

या पैशांमध्ये त्यांना एक घर घ्यायचं असून पंजाबमधून आपल्या आई-वडिलांना तिथे त्यांना राहायला आणायचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *