सांगा आम्ही “थर्टी फर्स्ट” साजरी करायची कशी?

ताज्या घडामोडी सोलापूर

* रात्रीच्या संचारबंदीने हॉटेल व्यावसायिक चिंताग्रस्त
* अनेकविध निर्बंधांमुळे तळीरामही चिंतेत

सोलापूर (चिदानंद चाबुकस्वार): हॉटेल व्यावसायिक व तळीराम हे  वर्षातील ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात तो थर्टीफर्स्टचा दिवस अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेला असताना युक्रेनमध्ये नव्याने आढळलेल्या विषाणूने अवघ्या देशाची चिंता वाढवल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने रात्रीची संचारबंदी घोषित केलेली आहे त्यामुळे “सांगा आम्ही थर्टी फर्स्ट साजरी करायची कशी? अशी म्हणण्याची वेळ आज हॉटेल व्यावसायिकांवर आलेली आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी 2020 साली भारत महासत्ता होईल असे सांगितले होते परंतु त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आणि 2020 हे केवळ भारतासाठी नव्हे तर सबंध जगासाठी कर्दनकाळ ठरले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.. अनेक जण उपासमारीने मृत्युमुखी पडले.. कोरोनाने तर कहर करत अनेकांचा बळी घेतला. कोरोना, टाळेबंदी, संचारबंदी यामुळे भल्याभल्यांचे व्यवसाय कोलमडले.. यातून हॉटेल व्यावसायिक तरी कसे सुटणार? कोरोनाच्या कर्दन काळात अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्या. टाळेबंदीमध्ये थोडीशी शीथीलता दिल्यानंतर आता कुठेतरी हॉटेल व्यवसाय  सुधारतो आहे तोचं सरकारने थर्टीफर्स्टच्या काही दिवस आधी लगेचच रात्रीची संचारबंदी घोषित केलेली आहे त्यामुळे सोलापूर शहरासह महाराष्ट्रातील सबंध हॉटेल व्यवसायिक चिंतेत आहेत. थर्टीफर्स्टच्या दिवशी रात्री अकरा वाजता हॉटेल बंद व्हायला पाहिजे अशी नोटीस त्यांना बजावण्यात आल्याचे अनेक हॉटेल व्यावसायिकांनी दैनिक जनसत्यशी बोलताना सांगितले. रात्रीची संचारबंदी शिवाय शासनाच्या अनेकविध जाचक निर्बंधांमुळे तळीरामांच्याही चिंतेत वाढ झालेली आहे.त्यामुळे थर्टी फर्स्ट ला हॉटेलमध्ये जावे की नको हा प्रश्न त्यांना पडल्याचे दिसून येत आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या नफ्याच्या दृष्टीने व तळीरामांच्या विरंगुळ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला थर्टीफर्स्ट हा दिवस साजरा करायचा कसा असा प्रश्न अनेक तळीरामांना पडलेला आहे. त्यामुळे सांगा आम्ही जगायचे कसे? हॉटेल व्यवसायचं बंद करू का? सध्या हॉटेल चालू ठेवणे परवडत नाही? कामगारांचा पगार निघत नाही? हॉटेल जर भाड्याने असेल तर गाळेधारक भाड्यासाठी ऐकत नाहीत? सध्या आम्ही अत्यंत आर्थिक संकटातून जात आहोत? आमचा हॉटेल सुरळीत चालू राहावा त्यासाठी सरकारने आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे अनेक प्रश्न व भावना हॉटेल व्यावसायिकांच्या आहेत ते समजून घेऊन सरकारने आता आमच्या व्यवसायाला मार्ग मोकळा करून द्यावा अशी आग्रही मागणी सध्या हॉटेल व्यवसाय करताना दिसत आहेत.
 

………………….
हॉटेल व्यवसाय सध्या आर्थिक विवंचनेतून अजून पूर्णपणे सावरलेला नसताना सरकारने रात्रीची संचारबंदी घोषित केलेली आहे ती आम्हाला परवडणारी नाही. सध्या सरकारने हॉटेल व्यवसायातील जे अडथळे आहेत ते दूर करून  आम्हाला व्यवसाय सुरळीत चालू राहण्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

…………………………….

आमचा हॉटेल व्यवसाय आर्थिक संकटातून अजून पूर्णपणे सावरलेला नाही त्यात सरकारने रात्रीची संचारबंदी घोषित करून आमच्या थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनवर बंधने आणलेली आहे ते आम्हाला परवडण्यासारखे नाही. सरकारने हॉटेल व्यवसायावर जर बंधनं आणली तर हॉटेल चालवायचे कसे कामगारांचा पगार कसा निघणार असे अनेक प्रश्न सध्या आमच्या समोर उभे आहे त्यामुळे सरकारने आम्हाला सध्यातरी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *