वाह रे पठ्ठ्या!…. इंजिनिअरची नोकरी सोडून उघडली चहाची टपरी

ताज्या घडामोडी देशविदेश

शिक्षण पूर्ण झाल्यांनंतर नोकरी करावी, अशी सर्वसाधारण परंपरा आहे. इंजिनिअरिंगनंतर मोठ्या कंपनीत चांगल्या वेतनावर नोकरी करावी. नोकरीत कष्ट करून वरची पदे मिळवावीत, याकडे बहुतांश तरुणांचा कल असतो. पण सध्या एक चहावाल्या इंजिनिअरचा फोटो व्हायरल होतोय. स्वतच्या समाधानासाठी या पठ्ठ्यानं गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली अन् चहाची टपरी टाकली आहे. आयएएस अवनीश शरन यांनी या तरुणाचा फोटो ट्विटरला पोस्ट केला आहे.

३० ऑगस्ट रोजी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. फोटोमध्ये तुम्हाला इंजिनिअर ते चहावाला याची संपूर्ण कथाच वाचता येईल. या चहावाल्यानं मंदीत संधी कशी शोधावी हे सांगितलं आहे. कोणतंही काम लहान नसतं. हे या तरूणानं आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. आपण जे काम करतो यात आपल्याला आनंद मिळायला हवा असंही त्यानं आपल्या चहाच्या टपरीवर लिहून ठेवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *