दररोज ‘हा’ एक कप चहा प्या आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती!

0
55

करोना काळात आपण सर्वांनीच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाय केले. अनेक पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केला. अशाच विविध घरगुती आणि नैसर्गिक उपचारांच्या मदतीने आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकता. या नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने वाढलेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे आपण अनेक प्रकारच्या संक्रमण, फ्लू आणि विषाणूंपासून दूर राहू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला एक अत्यंत सोपा मार्ग सांगणार आहोत. तुमच्या दररोजचा चहाला एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं बुस्टर पेय बनवण्यासाठी या पोष्टिक/औषधी पदार्थांचा समावेश नक्की करा.

तुमच्या चहामध्ये करा ‘असे’ बदल

तुमच्या रोजच्या चहामध्ये तुम्ही अशा काही गोष्टींचा समावेश करू शकता ज्याने तुमचा चहा रोग प्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. जर तुम्ही विचार करत असाल की रोग प्रतिकारशक्ती एका दिवसात वाढवता येते का? तर ते शक्य नाही. तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नियमित प्रयत्न करावे लागतात. तुम्ही चहामध्ये आले, मध किंवा गूळ टाकून चहा तयार करता. पण अशा काही दोन खास गोष्टी आहेत ज्या एक कप चहामध्ये मिसळल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या दोन खास गोष्टी.

मुलेथी

मुलेथीचा उपयोग आयुर्वेदात अनेक आजारांशी लढण्यासाठी केला जातो. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन चहामध्ये ही अद्भुत गोष्ट समाविष्ट करून घेतली तर तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होईल. मुलेथीमध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत. जी प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हे औषध केवळ सर्दी सारख्या समस्या दूर करत नाही तर घसा आणि श्वसन प्रणालीला ठीक करण्यास देखील मदत करते. यात अँटी-व्हायरल आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात.

लवंग

तुम्ही जर चहा मध्ये लवंग घातले तर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. लवंग घातलेला चहा प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तुम्ही लवंग घालून चहाची चव वाढवू शकता. शिवाय ते अँटी-व्हायरल आणि अँटी-ऑक्सिडंट्स समृद्ध असल्याने लवंग शरीरातील कंजेशन दूर करण्यास मदत करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here