मल्लिकार्जुन नगरात तरुणावर तलवार हल्ला ; चौघांवर गुन्हा

क्राईम सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी) : तू मल्लिकार्जुन नगर येथे ये असे फोन करून बोलवून तलवारीने वार केल्याची फिर्याद सुरेश बसप्पा पॅटी (वय-३५ रा.घर नंबर ३२६ किसान नगर,अक्कलकोट रोड,सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.ही घटना दि. ८ ऑगस्ट रोजी मल्लिकार्जुन नगर येथील रिक्षा स्टॉप येथे घडली.मल्लिनाथ गोडाळे रा.मल्लिकार्जुन नगर व त्याचे तीन अनोळखी मित्र असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, मल्लिकार्जुन नगर येथे फिर्यादी हे घरी असताना फिर्यादीला व आरोपींनी फोन करून तू मल्लिकार्जुन नगर येथे ये तुझ्याकडे काम आलय असे म्हणुन बोलावले.व त्यावेळी मल्लिनाथ घोटाळे व त्यांच्या तीन मित्राने कोणताही विचार न करता त्यांच्याकडील असलेली तलवारी काढली व तलवारीने फिर्यादीच्या डाव्या हातावर वार केला व आता तुला संपतो असे म्हणुन,फिर्यादीस फिर्यादीच्या मित्राला खाली पाडून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तेवढ्यात मल्लिनाथ गोधळे याने पुन्हा त्याच तलवारीने फिर्यादीच्या डोक्यात वार करून आरोपी पुन्हा फिर्यादीला म्हणाला की तू जरी आता वाचला तरी तुला जास्त जगू देत नाही माझ्या ट्रक खाली घेतो अशी धमकी देऊन निघून गेला असे फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास पोलीस नाईक तोगे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *