‘तयारीला लागा, महाराष्ट्रात कुणाच्याही मदतीशिवाय सत्तेत आलं पाहिजे’:अध्यक्ष जेपी नड्डा

ताज्या घडामोडी देशविदेश

मुंबई, :  ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या स्वार्था करता एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केले आहे. येणाऱ्या काळात कुणाचाही मदत न घेता सत्तेत येण्यासाठी तयारी करा’, असे आदेशच भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहे.

आज भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्हर्च्युअली घेण्यात आली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते हजर होते. यावेळी अध्यक्ष जेपी नड्डांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राज्य सरकारवर सडकून टीका केली.

‘अशी बैठक कधी होईल असं वाटलं नव्हतं. पण गरज हीच शोधाची जननी आहे, असं म्हणतात. हे कौशल्य पण आपण चांगलं आत्मसात केलं आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात भाजपने खूप चांगलं काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे राज्य सरकारला चांगलेच उघडे पाडले आहे’, असं म्हणत नड्डांनी भाजप नेत्यांचे कौतुक केले.

‘महाराष्ट्रात  स्वार्थाकरता एकत्र येऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हे  सरकार आहे. या सरकारनं कोरोना परिस्थितीमध्येही भ्रष्टाचार केला आहे. त्यांचे कारनामे हे  लोकांसमोर आणले पाहिजे’, असंही नड्डा म्हणाले.

तर, राष्ट्रीय अध्यक्षांनी कोरोनाच्या काळात देशातला एकही माणूस उपाशी राहणार नाही, असं म्हटलं होतं. मला त्यांनी 52 लाखांचे टार्गेट दिले होतं. मला ते अशक्य वाटलं होतं. पण ते मला म्हणाले ,मी तुम्हाला तुमच्या ताकदीची जाणीव करुन देतोय. त्यामुळे आपण राज्यात 2 कोटी 88 लाख लोकांना फूड पॅकेट वाटप करू शकलो, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

तसंच, ‘सरकारने कोरोना काळात भ्रष्टाचार केला, प्रेताच्या टाळूवरचं लोणी करण्याचा प्रयत्न केला. यातील भ्रष्टाचार पुढे आणावा लागेल. सरकार येईल ना येईल या चर्चेत जाऊ नका. देवेंद्र फडणवीस हे काही ते सांगतील. पण,  कोणत्याही आरोपाला प्रत्युत्तर द्या. कुणी टरबूज, कोणी चंपा म्हणतंय, कोणी कुत्रा म्हणतंय अशी खालच्या भाषेची टीका होत आहे. फक्त त्यात भाषा चांगली वापरा’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *