…तर भरावा लागू शकतो 2 लाखांचा दंड, मिठाई दुकानदारांसाठी नवे नियम लागू

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली: मिठाईच्या दुकानात (Sweet Outlets) मिळणाऱ्या खाद्य पदार्थांचा दर्जा सुधारावा, यासाठी केंद्र सरकारनं एक ऑक्टोबरपासून नवे नियम लागू केले आहेत. बंद डब्यात विक्रीसाठी बंद डब्यात विक्रीसाठी उपलब्ध मिठाईच्या बॉक्सवर ‘मॅन्युफॅक्चरिंग डेट’ (Manufacturing date), एक्सपायरी डेट (Expiry date)तसेच उपयोग करण्याचा कालावधीबाबत (Best Before Date) सूचना देणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र, या नियमांचं उल्लंघन केल्यास 2 लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो, अशी तरतूद करण्यात आली आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारा (FSSAI-Food Safety and Standards Authority of India)नवे नियम जारी करण्यात आले आहे. बाजारात विकल्या जाणारी सुट्या मिठाईचा उपयोग करण्याचा कालावधी संदर्भातही ग्राहकांना माहिती द्यावी लागणार आहे.

देशभरात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्याचबरोबर दिवाळी सण जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर FSSAI नं मिठाई दुकानदारांसाठी नवे नियम लागू केले आहेत. FSSAI नं देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी नवे नियम जारी केले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठवण्यात आलं आहे. येत्या 1 ऑक्टोबर 2020 पासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

गुजरातमधील अहमदाबाद येथील मिठाई दुकानदार कमलेश भाई यांनी सांगितलं की, FSSAIनं लागू केलेल्या नव्या नियमामुळे छोट्या दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कारण मिठाई दुग्धजन्य असल्यामुळे ती केव्हाही खराब होऊ शकते. मिठाई तयार करतानाच एक्सपायरी डेट निर्धारित करण्यात येत. तसा उल्लेख मिठाईच्या ट्रे केला जात असल्याचंही कमलेश भाई यांनी सांगितलं.

मिठाईची ‘एक्सपायरी डेट’ निर्धारित…

1 दिवस- कलाकंद, बटर स्कॉच कलाकंद, रोज कलाकंद, चॉकलेट कलाकंद.

2 दिवस- दुग्धजन्य पदार्थ, बंगाली मिठाई, मिल्क बदाम, रसगुल्ला, रसमलाई, रबडी, शाही टोस्ट, राजभोग, मलाई रोल, बंगाली रबडी, हिरमानी, हरिभोग, अनारकली, माधुरी, पाकीजा, रसकदम, रस काटा, खीर मोहन, गुड रसमलाई, गुड रबडी, गुड रसगुल्ला.

4 दिवस- मिल्क केक, पेढा, प्लेन बर्फी, मिल्क बर्फी, पिस्ता बर्फी, कोकोनट बर्फी, चॉकलेट बर्फी, सफेद पेढा, बूंदी लाडू, कोकोनट लाडू, लाल लाडू, मोतीचूर मोदक, खवा बदाम, मेवा भाटी, फ्रूट केक, खवा तीळ, केसर कोकोनट लाडू, मलाई घेवर, व्रत केसरिया कोकोनट लाडू, मेवा लाडू, पिंक बर्फी, ड्रायफ्रूट तीळ, शाही घेवर, खवा केसर बादाम रोल, खीर कदम, खीरा बीज बर्फी, खवा कोकोनट बर्फी, मोतीपाक.

7 दिवस- ड्राय फ्रूट लाडू, काजू कतली, घेवर, साखर पारा, गुळ पारा, शाही लाडू, मूंग बर्फी, आटा लड्‌डू, ड्राय फ्रूट गुजिया, बूंदी लाडू , काजू केसर बर्फी, काजू बेक्स गुजिया, बादाम लौंग, बालूशाही, बदाम बर्फी, केसर वडी मलाई, चंद्रकला, केसर गुजिया, मैदा गुजिया, काजू खजूर, पिस्ता लौंग, छोटा केसर घेवर, केसर चंद्रकला, काजू लड्‌डू, बेसन बर्फी, काजू रोस कतली.

20 दिवस- आटा लड्‌डू, बेसन लड्‌डू, चना लड्‌डू, चना बर्फी, अंजीर खजूर बर्फी, कराची हलवा, सोहन हलवा, गजक, चिक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *