सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी बॉलीवूडमधील बड्या दिग्दर्शकाची होणार चौकशी

क्राईम मुंबई

मुंबई, : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणीमुंबई पोलीस आता हाय प्रोफाइल व्यक्तींची चौकशी करणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांना मुंबई पोलीस लवकरच चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ANI शी बोलताना सांगितलं की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. पोलीस लवकरच दिग्दर्शक महेश भट्ट यांना चौकशीसाठी बोलवणार आहेत. तसेच दिग्दर्शक करण जोहरच्या मॅनेजरची देखील चौकशी करण्यात येणार आहे. गरज भासल्यास पोलीस करण जोहर यांना देखील चौकशीसाठी बोलावू शकतात.

दुसरीकडे, अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) तिच्या वकिलांमार्फत मुंबई पोलिसांना असे पत्र लिहिले आहे की, सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीमध्ये ती सहकार्य करू इच्छिते. पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले की कंगना हिमाचल प्रदेश मध्ये असल्याने मुंबई पोलीस तिला तिथे भेटायला येऊ शकतात किंवा ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तिचा जबाब नोंदवू शकते. दरम्यान बुधवारी वांद्रे पोलिसांनी कंगनाच्या चौकशीसाठी समन्स जारी केला होता. कंगना या चौकशीसाठी तयार आहे मात्र मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ती मुंबईत चौकशीला येण्यासाठी तयार नाही. त्यामुळे मनालीला एखादी टीम पाठवून चौकशी करू शकता, असं कंगनाने सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे

मुंबई पोलिसांनी समन्स पाठवल्यानंतर कंगनाच्या वकिलांनी त्यावर उत्तर दिले आहे. मनालीमध्ये तिच्या घरी पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्याची विनंती कंगनाने केली आहे. कंगनाच्या वकिलांनी या पत्रामध्ये लिहिले आहे की, ‘सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने कंगना रणौत यांना वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये 27 जुलैपर्यंत निवेदन देण्यास सांगितले आहे. सुशांतसिंग राजपूत यांच्या प्रकरणी माझी क्लायंट तुम्हाला मदत करू इच्छित आहे. 17 मार्च 2020 पासून, त्या हिमाचल प्रदेशमधील मनाली याठिकाणी असणाऱ्या घरात राहत आहेत आणि कोरोना व्हायरसमुळे जारी केलेल्या लॉकडाऊन नियमांचे पालन करीत आहेत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *