सुशांत सिंह राजपूतचे ‘ते’ 15 कोटी रुपये नेमके कुठे? धागादोरा CBI ला सापडला

ताज्या घडामोडी मनोरंजन मुंबई

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने (rhea chakraborty) सुशांतचे 15 कोटी रुपये लुटल्याचा आरोप केला होता. मात्र रियाच्या बँक खात्यात असा कोणताही व्यवहार सापडला नाही. मग सुशांतच्या वडिलांनी 15 कोटींचा हा आरोप केला होता, इतकी मोठी रक्कम मग नेमकी गेली कुठे असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दरम्यान याबाबत आता सीबीआयला धागादोरा सापडला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुशांतच्या कुटुंबाने सुशांतच्या ज्या 15 कोटी रुपयांबाबत तक्रार केली, ते पैसे सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीच्या वडिलांच्या कंपनीत गुंतवले असल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. श्रुतीच्या वडीलांची गार्मेंटची मोठी कंपनी आहे. याप्रकरणी आता लवकरच तपास होणार आहे.

दरम्यान रिया चक्रवर्ती आणि श्रुती मोदी एकमेकींना आधीपासूनच ओळखत होत्या, अशी माहितीदेखील समोर येत आहे. श्रुती ही रियाची लहानपणीची मैत्रीण आहे आणि सुशांतवर दबाव टाकून रियाने तिला सुशांतची मॅनेजर बनवलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

श्रुती मोदीला आज एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण रियाला आधीपासून ओळखत असल्याचं श्रुतीने एनसीबीला सांगितलं आहे. रिया आणि श्रुती लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. रियानेच श्रुती आणि सुशांतची भेट घडवून दिली आणि तिला मॅनेजर बनवलं. सुशांत श्रुतीला आपला मॅनेजर बनवण्यासाठी तयार नव्हता. मात्र रियाने त्याच्यावर दबाव टाकला आणि श्रुतीला त्याचा मॅनेजर बनवलं.

श्रुतीला रिया आणि शोविकच्या ड्रग्ज व्यवहाराबाबत पूर्णपणे माहिती होती. ती या प्रकरणात पूर्णपणे सहभागी होती. सुशांतच्या इथं नोकरी सोडल्यानंतरदेखील श्रुती रिया आणि ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होती. सीबीआयने श्रुतीचा फोन जप्त केला आहे, त्यामध्येदेखील ड्रग्ज पेडलरसह तिचे चॅट्स सापडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *