सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला

ताज्या घडामोडी मनोरंजन मुंबई

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सुनावणी पूर्ण झाली. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश राखून ठेवला. न्यायालयाने सर्व पक्षांच्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद संक्षिप्त स्वरुपात लेखी देण्याच्या सूचना केल्या आहेत.

केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी म्हटलं की, सीआरपीसी CrPC 174 अंतर्गत सुरू झालेल्या घटनेच्या मृत्यूची चौकशी फारच थोड्या काळासाठी सुरु राहते. मृतदेहाकडे पाहून आणि घटनास्थळी जाऊन मृत्यूचे कारण संशयास्पद आहे की नाही हे पाहिलं जातं. मग FIR नोंदवला जातो. मुंबई पोलिस जे करत आहेत ते योग्य नाही.

यापूर्वी सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांचे वकील विकास सिंह म्हणाले की सुशांतला कुटुंबापासून दूर केलं जात होतं. सुशांतच्या वडिलांनी वारंवार विचारले होते की सुशांतवर काय उपचार सुरु आहेत. मला तिथे येऊ द्या. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणात अनेक बाबी तपासण्यायोग्य आहेत. असे दिसते आहे की गळ्यातील खुणा बेल्टच्या होत्या. पंखावरून लटकलेला मृतदेह कोणाला दिसला नाही.

ते म्हणाले, “मीडिया रिपोर्टच्या आधारे समोरिल बाजूकडून युक्तिवाद सुरु आहे. मात्र आम्ही तस होऊ देणार नाहीत. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मुलगाही सहभागी असल्याचे मीडिया सांगत आहे. पण यावर मला काही सांगायचे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *