सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची नवी बाजू समोर, पार्थिवाजवळ ‘त्या’ तरुणाला भेटली ‘मिस्ट्री गर्ल’

मनोरंजन

मुंबई, : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणावर एकीकडे राजकारण पेटलेले असताना आता एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत एक तरुणी संशयास्पद दिसून आली आहे.

ग्रजी वृत्तवाहिनी रिपब्लिक टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली होती. त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी दिसत आहे. या तरुणीवर सुशांतच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे.

एका काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक तरुण सुशांतच्या पार्थिवाजवळ काळी बॅग घेऊन उभा होता. त्याने गुलाबी रंगाची टोपी घातलेली आहे. ही व्यक्ती सुशांतचा हाऊस मॅनेजर दीपेश सावंत असल्याचं बोललं जात आहे.  पण, काही वेळानंतर ही व्यक्ती बॅग घेऊन खाली उतरताना दिसत आहे.

याच व्हिडिओमध्ये  निळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या टॉपमध्ये एक तरुणीही दिसत आहे. ज्या ठिकाणी सुशांत राहत होता तिच्या कंपाऊंडमध्ये ही मुलगी आढळून आली. हीच मुलगी त्या व्यक्तीला भेटते. पण, जेव्हा हे दोघे जण भेटता तेव्हा दोघांच्या हातात काळी बॅग नव्हती. विशेष म्हणजे, यावेळी मुंबई पोलीसही तिथेच होते.

या व्हिडिओ प्रसारीत झाल्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनीही आश्चर्य व्यक्त केले. जर घरातून कुणी काही वस्तू घेऊन जात असेल तर ते संशायस्पद आहे. ही मुलगी कोण आहे, ती तिथे काय करत होती. याची माहिती मिळाली पाहिजे, अशी मागणी सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह ) यांनी केली.

दरम्यान, विकास सिंह यांनी सुशांतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहे. वृत्त संस्था ANI शी बातचीत करताना सुशांतच्या वडिलांना विकासला सांगितले, सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूच्या वेळेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याला मारल्यानंतर फाशी देण्यात आली होती की त्याचा मृत्यू फाशीमुळे झाला होता? त्यांनी सांगितले की या सर्व गोष्टी मृत्यूची वेळ माहिती असल्यावरचं स्पष्ट होऊ शकतील.

यापूर्वी सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी सांगितले की, ‘माझ्या तक्रारीत हे स्पष्ट करण्यात आले आहे की मुंबई पोलिसांनी या प्रकरणात गोंधळ केला आहे. ते योग्य पद्धतीने तपास करीत नाहीत. मला बिहारमध्ये FIR दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझी मुलगी अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर होती जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला आणि सुशांतची बॉडी खाली उतरवली. त्यांनी दरवाजा उघडण्यापूर्वी टाळं तोडणाऱ्याला कोठून पाठवलं. या सर्व गोष्टी संशयास्पद नाहीत का? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूची वेळ देण्यात आलेली नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *