न्यायाधीशांनी सरकारी बंगल्यात साडीने गळफास घेऊन केली आत्महत्या

ताज्या घडामोडी देशविदेश

छत्तीसगड: गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आत्महत्यांच्या (Sucide Cases) सत्रांमुळे देश ढवळून निघाला आहे. त्यात आज पुन्हा एकदा अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील मुंगेली येथे तैनात असलेल्या जिल्हा व सत्र न्यायाधीश कांता मार्टिन यांनी रविवारी आत्महत्या केली. त्यांनी स्वत:च्या घरामध्ये साडीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलीस रविवारी त्यांच्या अधिकृत बंगल्याचा दरवाजा तोडत आता शिरले, यावेळी कांता मार्टिन यांचा मृतदेह लटकलेला आढळला. महिला न्यायाधीशांनी आत्महत्या का केली याबाबत नेमकी माहिती मिळाली नाही. मुंगेलीचे एसपी अरविंद कुजूर यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार न्यायाधीश कांता मार्टिन घरात एकट्याच राहत होत्या. एकाकीपणामुळे त्या नैराश्यात गेल्या शक्यता व्यक्त केली जात आहे.

रविवारी सकाळी नऊच्या सुमारास मार्टिन यांच्या घरातील आचारी त्यांच्या बंगल्यावर आला. दरवाजा बंद असल्याने तो बराच वेळ बेल वाजवत बाहेर उभा राहिला. त्याने कांता मार्टिन यांना फोन केले पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी शेजारी राहणाऱ्या अन्य कोर्टाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच एसपी घटनास्थळी दाखल झाले. त्याने फ्लॅशलाइटच्या मदतीने खिडकीतून पाहिले आणि मार्टिनचा मृतदेह हवेत लटकलेला दिसत होता. यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह खाली आणला. खोलीतून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही.

नवऱ्याचा झाला मृत्यू, मुलगा इतर शहरात राहतो

पोलिसांनी सांगितले की न्यायाधीश कांता मार्टिन यांच्या पतीचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. त्यांची दोन मुलं रायपूर आणि दिल्ली येथे राहतात. कांता मार्टिन हे जुलै 2019 पासून मुंगेली जिल्ह्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. त्या यापूर्वी बिलासपूर, कांकेर, दुर्ग आणि रायपूर येथे काम करीत होत्या. त्या मध्य प्रदेशातील कटनीचीच्या रहिवासी होत्या. या घटनेची माहिती पोलिसांनी त्यांच्या मुलांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *