बार्शी : दि (तालुका प्रतिनिधी) लहुजी वस्ताद चौक बार्शी येथे राहणाऱ्या लक्ष्मी अनंत बगाडे या विवाहितेने आत्महत्या केली आहे.
अधिक माहिती अशी की वरील महिला काल दि ११ रोजी म्हैसगाव ता माढा येथे माहेरी जाण्यासाठी चालत निघाली होती ,
खांडवी पर्यंत चालत गेल्यावर तिच्या पतीने समजूत काढून परत आणले होते आज रविवारी सकाळी शहरातील सुभाष नगर भागात गणेश तलाव या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत शहर पोलिसात अकस्मात निधन म्हणून नोंद करण्यात आली आहे या परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे करोनाच्या अनामिक भीतीने आत्महत्या केली असावी असे बोलले जात आहे मात्र या बाबतीत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप तरी नाही