तुंगत:- महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यावर फार मोठे संकट कोसळले असून ह्या महापुराने अनेकांचे संसार ,घरे , व्यवसाय उध्वस्त झाले आहे .

तसेच मानवहानी सारखे खूप मोठे संकट आले. यासारख्या गंभीर संकटातून दिलासा देण्यासाठी सर्वत्र मदतीचा ओघ चालू आहे .त्याचाच एक भाग म्हणून संकटग्रस्त गावांना मानवतेच्या भावनेतून आपणही काहीतरी देणे लागत असल्याची जाणीव झाली.यामुळे तुंगतता.पंढरपूर येथील स्टार फाउंडेशन व तुंगत ग्रामस्थांच्या सहकार्याने खारीचा वाटा म्हणून सर्व उपयोगी वस्तु धान्य, कपडे, खाद्यपदार्थ ,पिण्याचे पाण्याची बॉटल ,तेल-साबण ,साखर ,मीठ, बिस्किटे अशा अनेक गरजू वस्तू संकट ग्रस्त भागातील जनतेला आधार म्हणून देण्याचे चांगले काम केले.

तुंगत येथील स्टार फाउंडेशन व ग्रामस्थ यांनी आपापल्या परीने मदत करण्यात पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात मदतीचा साठा जमा झाला.
गावचे सरपंच आगतराव रणदिवे, उपसरपंच पंकज लामकाने ,सोलापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष विजय रणदिवे ,सदस्य औदुंबर गायकवाड ,धनाजी रणदिवे ,स्टार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अकील मुलाणी, ताजुद्दीन मुलाणी, सागर रणदिवे आदी ग्रामस्थांच्या हस्ते वस्तूंचे पूजन करून मालाचा टेम्पो पूरग्रस्त भागाकडे रवाना केला .याउपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here