कन्नड संघटनांची अरेरावी सुरूच!

Uncategorized ताज्या घडामोडी देशविदेश

कन्नड संघटनांची अरेरावी सुरूच! सोलापूरकडे येणाऱ्या गाडीवर फेकली शाई; कानडी भाषेत पोस्टरही लावले

मराठी-कानडी वादाने गेल्या काही दिवसांपासून वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 17 जानेवारी कर्नाटक– महाराष्ट्र सीमा लढ्यात आपल्या प्राणाचं बलिदान देण्याऱ्या लोकांना हुतात्मा दिनी अभिवादन केलं होतं, त्यानंतर हा वाद आणखी चिघळला. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आमच्या ताब्यात असलेली एक इंचही जमीन आम्ही महाराष्ट्राच्या वाट्याला येऊ देणार नाही, अशी कडवी प्रतिक्रिया दिली होती.

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा धुमसू लागलेल्या या वादाने आज आणखी वेगळं वळण घेतलं आहे. गुलबर्गा याठिकाणी काही कानडी संघटनांची अरेरावी पाहायला मिळाली.

गुलबर्गा-सोलापूर गाडीवर या कानडी संघटनांनी कानडी भाषेतील पोस्टर लावले आहे.

याशिवाय त्यांनी गाडीवर काळी शाई देखील फेकल्याने महाराष्ट्रातून या घटनेचा निषेध केला जात आहे.

विशेष म्हणजे या संघटनांनी सोलापूरला येणारी गाडी मध्येच अडून हा प्रकार केला. त्यांनी गाडीच्या टपावर चढून झेंडे फडकवत अशाप्रकारे हैदोस घातला

कर्नाटकात (Karanataka) ज्या भागात मराठी (Marathi) भाषा बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे, असे भाग महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा निघेपर्यंत विवादास्पद भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *