पिलीव घाटात सातारा-सोलापूर एसटीवर दगडफेक,अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी सोलापूर

पंढरपूर : सातारा येथून सोलापूरकडे निघालेल्या एसटी बसवर पिलीव घाटात अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. मात्र बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने यात कोणी जखमी झाले नसले तरी बसमागून येणाऱ्या दुचाकीवरील दोघांना दगड लागून ते जखमी झाल्याचा प्रकार काल रात्री आकराच्या सुमारास घडला होता. दरम्यान पोलिसांनी रात्रभर केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये एक दुचाकी घटनास्थळाच्या जवळ सापडली आहे . ही मोटारसायकल देखील चोरीची असल्याचं पोलिसांना आढळून आले असून म्हसवड व माळशिरस ]चे पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान या प्रकारामुळे पिलीव परिसरातील नागरिक व वाहनचालकात दहशतीचे वातावरण आहे. या प्रकरणी अज्ञात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

काल रात्री म्हसवड येथून जेवण करून निघालेली ही बस पिलीव घाट उतरत असताना शेवटच्या वळणाजवळ झाडीत दाब धरून बसलेल्या काही लोकांनी बसवर दगडे फेकण्यास सुरुवात केली होती. बस चालक कदम यांनी समय सूचकता दाखवत बस न थांबता पुढे पळवली. यावेळी बसमध्ये वाहक आणि चालकाशिवाय एकही प्रवासी नसल्याने या बसच्या काचा फुटल्या तरी कोणी प्रवासी जखमी झाले नाही. बसमागून येणाऱ्या दुचाकीलाही दगडे लागल्याने दुचाकीवरील दोघे जखमी झाले असून ते उपचाराला अकलूज येथे निघून गेले. बस घाट उतरून खाली उतरताच त्यांनी घाटात जाणारी वाहने थांबवली होती. नंतर पोलीस आल्यानंतर वाहतूक सोडण्यात आले होती. या घटनेत कोणतीही लूटमार झाली नसली तरी बसवर झालेल्या दगडफेकीचा उद्देश लुटमरीचाच असण्याची जास्त शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *