मंगळवेढा(प्रतिनिधी )ःमंगळवेढा आगाराच्या एस.टी.बसेस पुणे,अहमदनगर या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार असल्याची माहिती प्रभारी आगार प्रमुख गुरुनाथ रणे यांनी दिली असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवेढा आगाराकडून जिल्हांतर्गत बससेवा सुरु असून सोलापूर मार्गावर सध्या प्रवाशांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून दि. 20 ऑगस्टपासून आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिल्याने मंगळवेढा आगारातूनही लांब पल्ल्याच्या मार्गावर गाडया धावणार आहेत. या प्रवासी गाडया ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पुर्वीसारख्या नियमितपणे सुटणार आहेत.याबाबत प्रवाशांनी कुठलीही शंका न बाळगता एस.टी.ने प्रवास करावा असे आगाराकडून सांगण्यात आले.
प्रवाशांनी मास्क वापरणे,सॅनिटायझरचा वापर,सोशल डिस्टन्स याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान एका आसनावर एकच प्रवासी बसणार असून एस.टी.च्या प्रवास दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही याचा खुलासा एस.टी.कडून करण्यात आला आहे. पुणे,सोलापूर,पंढरपूर,अहमदनगर या मार्गावर धावणार्या गाडयांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे- मंगळवेढयातून पुणेकडे जाणार्या गाडया-7.30,9.30,11.30,14.30 पुण्याहून मंगळवेढयाकडे येणार्या गाडया-7.30,9.30,14.30,16.30 सोलापूरकडे जाणार्या गाडया 6.30,8.30,10.30,11.30,12.30,13.30,15.30,17.30
सोलापूरहून मंगळवेढयाकडे येणार्या गाडया -8.30,10.30,12.30,13.30,14.30,15.30,17.30,19.30 पंढरपूरला जाणार्या गाडया- 7.00, 8.00. 9.00, 10.00, 11.00, 11.30, 12.00, 13.00, 14.00, 14.30, 16.30,17.15.मंगळवेढयाकडे येणार्या गाडया 8.00, 9.00, 10.00 ,11.00, 12.00, 12.30, 13.00, 14.00,15.00,15.30,17.30,18.15. अहमदनगरकडे जाणारी गाडी 15.00 नगरहून मंगळवेढयाकडे येणारी गाडी 8.00 असे गाडयांचे वेळापत्रक आहे.प्रवाशांना ई पासची व वैधकिय दाखल्याची गरज नसल्याचे सांगन्यात आले.
——————————-
