सोनं पहिल्यांदाच 50 हजारांपार, चांदीच्या दरानेही गाठला नवा उच्चांक

ताज्या घडामोडी

: करोना संकटाच्या काळात देशभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. बुधवारी(दि.22) भारतीय सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दराने तर नवा उच्चांक गाठला आहे.
चांदीचे दर 61 हजार रुपये प्रति किलोग्राम झाले, तर सोन्याच्या दरांनीही प्रति 10 ग्रामसाठी 50 हजार रुपयांचा आकडा ओलांडला. बुधवारी भारतीय बाजारात एक किलोग्राम चांदीचे दर 61,200 रुपये झाले. गेल्या सात-आठ वर्षांमधील चांदीचे हे सर्वाधिक दर असल्याचं सांगितलं जात आहे.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) बुधवारी सकाळी चांदीचे दर 58,000 रुपये होते, थोड्याच वेळात यात वाढ झाली आणि दर 61,200 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचले. तर सोन्याच्या दरांनीही 50 हजाराचा आकडा ओलांडला. बुधवारी एमसीएक्सवर सुरूवात होताच सोन्याचे दर 49,931 रुपयांवरुन थेट 50,020 रुपये प्रति 10 ग्रामच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले.
करोना संकटकाळात सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीतील गुंतवणूक वाढल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तर, अनलॉकनंतर इंडस्ट्रीयल डिमांड वाढल्यामुळेही चांदीच्या दरात वाढ झाली असू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण या वाढलेल्या दरांमुळे सोने-चांदी खरेदी करण्याची इच्छा असणार्‍या नागरिकांना मात्र चांगलाच घाम फुटला आहे.
किती होते दर? –
चांदीचा दर 1 जानेवारी रोजी 47666 रुपये प्रति किलो होता. तर , 31 डिसेंबर 2019 रोजी सोन्याचे दर 49996 रुपये प्रति 10 ग्राम होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *