मोहोळ : सोनारासह अनेक पतसंस्था व खाजगी बॅंकामध्ये मोठ्या प्रमाणात सोने गहाण ठेऊन अनेकांची फसवणूक

ताज्या घडामोडी सोलापूर

जनसत्य, प्रतिनिधी

मोहोळ : तांबे व इतर धातु मिक्स करून बनवलेल्या बनावट सोन्याच्या साखळ्या विकून सोनारासह अनेक पतसंस्था व खाजगी बॅंकामध्ये मोठ्या प्रमाणात सोने गहाण ठेऊन अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकास आटपाडी तालुक्यातील पिसेवाडी येथील मनोज मधुकर बनगर याच्यासह त्याचा साथीदार इस्माईल मणियार (रा.सावळेशवर) या दोघांसह यांच्या टोळीत एजंट म्हणून काम करणारा भुताष्टे (ता. माढा) येथील बळी आबा यादव यालाही पोलिसांनी अटक केली असून या टोळीच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्याचे समोर येत आहे. त्याचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचे सोलापूर येथील सोनार मारूती रेवणकर याला मागील सहा महिन्यपूर्वी सावळेश्वर येथील पप्पू उर्फ दावल तांबोळी यानी वेळोवेळी बनावट सोन्याच्या साखळ्या देऊन सहा लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केली होती. याच दरम्यान २६ जानेवारी रोजी गावातीलच इस्माईल इन्नुस मणियार याने पुन्हा बनावट सोने देऊन मारुती रेवणकर यांची फसवणूक करताना त्यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने मोहोळ पोलिसांशी संपर्क साधल्या वर मोहोळ पोलिसांनी इस्माईल मणियार यास अटक केली होती.           इस्माईल मणियार यांच्याकडे कसून चौकशी केली असता या टोळीचा प्रमुख सूत्रधार आटपाडी तालुक्यातील पिसेवाडी गावचा मनोज मधुकर बनगर असल्याचे त्याने सांगितले. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, पो. कॉ प्रवीण साठे यांचे पथक आटपाडी येथे दि. २६ जानेवारी रोजीच रवाना होऊन मनोज बनकर याला सिनेस्टाईल ने ताब्यात घेतले, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील बबलू पठाण याच्याशी ओळख झाल्याने त्यातूनच या सोन्याच्या विक्री बाबत व सोने गहाण ठेवण्याबाबत दोघांची एकमेकांशी चर्चा झाली व सावळेश्वर येथेच प्लॅन ठरला. त्यानुसार दिल्ली येथील सोन्याच्या साखळी वर ती होलमार्क देणाऱ्याशी संपर्क साधून त्याच्या मार्फत सोन्याचे कोटिंग व होलमार्क असलेल्या सोन्याच्या साखळ्या दिल्ली हुन पुण्यापर्यंत कुरिअर द्वारे मागवून पुण्यातून सावळेश्वर येथे आणून सावळेश्वर मधून या बनावट साखळ्या कोणत्या बँकेत कोणत्या पतसंस्थेत कोणत्या सोनाराकडे ठेवायच्या. या साठी एजंट नेमून त्या एजंट मार्फत हा उद्योग करत असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मोडनिंब येथे जाऊन भुताष्टे येथील बळी आबा यादव (वय ५०) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने ज्या बँकेत साखळ्या ठेवल्या त्या बँकांची नवे सांगितले आहेत. या बनावट साखळ्या गहाण ठेवण्यामागे प्रत्यक एजंटला १० हजार रुपये देत असल्याचे सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती देताना संतोष इंगळे यांनी सांगितले की या टोळीने मोहोळ येथील आय सी आय सी आय बँकेत याशिवाय शहरातील नामवंत पतसंस्था व सोनार यांच्याकडे काही प्रमाणत या बनावट साखळ्या ठेवल्या असल्याचे सांगितले आहे. याशिवाय सोलापूर येथील अक्सिस बँकेसह काही सोनाराकडे महिलांमार्फत या बनावट साखळ्या ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी इस्माईल मणियार, मुख्य सूत्रधार मधुकर बनकर, बळी आबा यादव या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांच्या चौकशी दरम्यान दावल तांबोळी व अन्य दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. 
      याप्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, पो कॉ प्रविण साठे करत आहेत.या बनावट सोने प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनोज बनगर हे अवघ्या चोवीस वर्षाचा असून तो पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीमध्ये घेत होता. दरम्यान सावळेश्वर येथे एक वर्षांपूर्वी आले असता एक व्यक्ती बरोबर भागीदारीमध्ये सोन्याचा व्यवसाय करण्याचे ठरवले. याचे थेट दिल्ली येथे कनेक्शन असून तेथे होलमार्क तयार करणाऱ्यांशी संधान साधून कुरियर मार्फत थेट पुणे येथे हे बनावट सोने मागवले जायचे. तर पुण्याहून सोलापूर- पुणे हायवेने सावळेश्वर येथे हे बनावट सोने आणून येथून एजंटांमार्फत ठिकठिकाणी पतसंस्था बँका किंवा सोनाराकडे हे सोने गहाण ठेवले जायचे. यामध्ये दहा हजार रुपये मिळायचे.

बनावट सोने गहाण अथवा  विक्री करण्याचे प्रमाणामध्ये वाढ झाली असून बँका, पतसंस्था, सोनार, ज्वेलर्स, अधिकृत खाजगी व्यक्ती यांनी सोने तारण म्हणून घेताना योग्य ती खातरजमा करून  तसेच कॅम्पुटरराईजड मशीनद्वारे सोने चेक करूनच  व्यवहार करावा. असा प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क साधावा.
-अशोक सायकर पोलीस निरीक्षक, मोहोळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *