जिल्हाधिकारी साहेब,वाळूमधील ‘वळू’ शोधाच!

ताज्या घडामोडी सोलापूर


मोहोळसह जिल्ह्यात महसूल अन् वाळू माफियानी उन्माद माजवलाय,ठोस भुमीका घ्यावीच
सोलापुर / सरदार आत्तार
सोलापूर जिल्ह्यात बेकायदा वाळू उपसा अगदी खुलेआम सुरू आहे.याला महसूल विभागाचा छुपा पाठींबा असल्यानेच हा उद्योग वाळू माफियांनी दिवसा ढवळया सुरू केला आहे. सोलापूर जिल्ह्यात बेकायदा वाळू उपसा अन् वाहतूक सुरू असल्याने जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात घेतले जात आहे.वाळूच्या व्यवसायातून महसूल अधिकारी अन् वाळू माफिया यांनी करोडो रूपयाची काळी माया जमवली आहे.जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात वाळूचा बेकायदा उपसा नदीपात्रातून सुरू आहे.यामध्ये बेकायदा वाळू उपसा अन् वाहतूक यामध्ये मोहोळ तालुका सोलापूर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्हाधिकारी शंभरकर साहेब,तुम्हाला वाळूमधील ‘वळू ’ घरातला आहे की बाहेरचा हे समजून घ्यावेच लागेल.त्यांनतर कारवाईचा बडगा उगारावा लागेल. नाहीतर काळ सोकावल्यास ते कोणालाही परवडणारे नसेले हेही तिथकेच सत्य आहे.
सोलापूर जिल्ह्यातून चार नद्या वाहतात या नद्यामध्ये पाऊस आणी पुरामुळे मुबलक प्रमाणात वाळूचा साठा झाला आहे.याची संधी साधून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वाळू उपसा अन् वाहतूक करणार्‍या मोठ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. या टोळयानी बेकायदा वाळू उपशा मधून करोडो रूपयाची काळी माया जमवली आहे.बेकायदा वाळू उपसा तालुक्यातील तहसीलदार,सर्कल,तलाटी यांना हाताशी धरून केला जात आहे.वाळू माफिया बरोबरच महसूल विभागातील अधिकारी,कर्मचारी हे देखील वाळूच्या बेकायदा व्यवसायामुळे मालामाल होत असल्याने त्याकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष केले जात आहे.
मोहोळ तालुक्यात बेकायदा वाळू उपशाने थैमान घातल्याचे पोलीस कारवाईने स्पस्ट झाले असतानाही मोहोळचे तहसीलदार बनसोडे वाळू उपसा व वाहतूक याबाबत ते कोणतीच ठोस भुमीका का घेत नाहीत.याची चाचपणी जिल्हाधिकारी यांनी घेण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी साहेब, आजपर्यंत पोलीस विभागाने जिल्हाभरात अनेक ठिकाणी बेकायदा वाळू उपश्यावर कारवाया केल्या आहेत. यामध्ये लाखो रूपयांची वाहने व वाळू जप्त केली आहे. त्याचबरोबर यामध्ये असणार्‍या वाळू माफियावर गुन्हे दाखल केले. मात्र ज्याच्या हद्दीमध्ये हा वाळू व्यवसाय सुरू होता तेथील तहसीलदार,सर्कल,तलाटी यांच्यावर आजपर्यंत कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्याचबरोबर तहसीलदार यांनी तलाटी व सर्कल यांच्यावर कारवाई केल्याची माहिती आजपर्यंत समोर आलेली नाही. जिल्ह्यातील सर्व तहसील निहाय आढावा घेवून संबधीत जबाबदार असणार्‍या तहसीलदार,सर्कल,तलाटी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलाच पाहिजे.या सर्व प्रश्‍नाचे उत्तर जनतेला अर्थातच थेट जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून अपेक्षीत आहेत.
पोलीस बेकायदा वाळू उपसा व वाहतूक करणार्‍यावर कारवाई करत आहेत. मात्र ज्याच खर काम आहे ते महसूल विभाग मात्र बघ्याची भुमीका वटवत आहे. नेमक महसूल विभागाला काय अभिप्रेत आहे असा प्रश्‍न यानिमीत्ताने उपस्थीत होत आहे. जिल्ह्यातील वाळू माफियाचे कंभरड मोडायचे झाल्यास जिल्हाधिकारी शंभरकर यांना ठोस भुमीका हाती घेण्याची अवश्यता आहे.अन्यता करोडो रूपयाची शासकीय मालमत्ता डोळ्यादेखत वाळूमाफिया लुटून नेत असताना नुसत पाहत बसाव लागणार आहे.
जिल्हाधिकारी साहेब,महसूल विभागातील झारीतील ‘शुक्राचार्यांना’ शोधून त्यांना खड्यासारखे बाजूला करणे गरजेचे आहे. या काळ्या धंद्याकडे लक्ष न देणार्‍या मुजोर अधिकार्‍यांना याचा जाब विचारला गेला पाहिजे. ते तुम्ही नक्की कराल! मात्र आता जिल्ह्यातील वाळू माफिया आणी त्यांच्या बरोबर लागेसंबध असणार्‍या महसूल विभागातील अधिकारी अन् कर्मचारी यांना शोधण्याचे आव्हान तुम्ही आणी तुमची टिम कसे पार पाडतेय याकडे सोलापूरकराच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *