थकबाकीपोटी साडेसोळा लाख रुपये वसूल-शहर कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून कारवाई

ताज्या घडामोडी सोलापूर


जनसत्य प्रतिनिधी

शहर कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून थकबाकीदारांवर बुधवारी विडी घरकुल, रविवार पेठ, सलगर वस्ती आदी ठिकाणी कारवाई केली. या करवाईमध्ये साडेसोळा लाख रुपये वसूल तर तीन नळ कनेक्शन तोडण्यात आले असल्याची माहिती शहर कर आकारणी व कर संकलन कार्यालयाचे प्रमुख प्रदीप थडसरे यांनी दिली.      महानगरपालिकेकडील मिळकत कर वसुलीची मोहीम आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशावरुन अधिक तिव्र करण्यात आली आहे. तर थडसरे पी. व्हि. यांच्या उपस्थितीत राबवण्यात आली. आज विडी घरकुल, रविवार पेठ, सलगर वस्ती या भागात वसुली मोहिम राबवण्यात आली. यामध्ये बिडी घरकुल येथे आशोक मोहन देवनपल्ली यांच्याकडून 62 हजार 223 रुपये, जैतनबी इसाक होटगी यांच्याकडून 46 हजार 628 रुपये, अनुसया अमोघसिध वडडेपल्ली यांच्याकडून 92 हजार 808 रुपये या थकबाकीपोटी तीन नागरिकांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. तर घरकुल, रविवार पेठ, सलगर वस्ती येथील थकबाकीदारांकडून 16 लाख 69 हजार 173 रुपये वसूल करण्यात आले. या मोहिमेमध्ये कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील शहापूरे सिलार, इंगोले, फुले, गुर्रम, सुरेंद्र गायकवाड, जोशी व  पेठेतील इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *