पुरेशी झोप न मिळाल्याने मुलांना मधुमेह होण्याचा धोका

लाइफस्टाइल


सर्व पालकांनी नोंद घ्यावे, असे संशोधन नुकतेच ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झाले आहे. रात्री पुरेशी झोप मिळाली नाही, तर लहान मुलांना मधुमेह होण्याचा धोका असतो असा निष्कर्ष ब्रिटनमधील या संशोधनातून काढण्यात आला आहे.
लंडन येथील सेंट जॉर्जेज यूनिव्हर्सिटी या विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. ब्रिटनमधील नऊ व दहा वर्ष वयोगटातील विविध वंशाच्या 4525 मुलांचे शारीरिक माप, त्यांच्या रक्ताचे नमूने आणि प्रश्‍नावलीचा या संशोधकांनी अभ्यास केला. त्या जी मुले अधिक वेळ झोपतात त्यांचे वजन तुलनेने कमी असते, असे त्यांना आढळले. झोपेची वेळ व इन्सुलिन, इन्सुलिन प्रतिरोधक आणि रक्तातील ग्लुकोज यांचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे झोपेचा अवधी जास्त असेल तर इन्सुलिन, इन्सुलिन प्रतिरोधक आणि रक्तातील ग्लुकोज यांचे प्रमाण कमी असते, असे या अभ्यासात आढळले. दहा वर्षांच्या मुलांनी 10 तासांची झोप घ्यावी, असे प्रमाण ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने (एनएचएस) ठरवून दिले आहे.
‘‘जीवनातील आरंभीच्या काळापासून झोपची अवधी वाढविल्याने शरीरातील चरबी आणि टाईप 2 मधुमेहाची पातळी कमी करण्यास मदत होते. लहानपणीच्या काळात पुरेशा झोपेच्या संभाव्य लाभांचा फायदा तारुण्यात आरोग्याला होऊ शकतो, असे या संशोधनातून दिसते,ङ्गअसे या विद्यापीठाचे प्रोफेसर क्रिस्टोफर जी ओवेन यांनी सांगितले. पेडियाट्रिक्स या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *