लेटर बॉम्ब टाकल्यानंतर परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टात धाव

क्रीडा ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई :  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगयांनी पत्र लिहून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सरकारने अजून कोणतीही कारवाई न केल्यामुळे आता परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे.

परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ‘राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यासाठी सांगितले होते.हे एक मोठं षड्यंत्र आहे, पोलीस विभागाला खंडणी मागायला लावणं याला तर माफीच असू शकत नाही. सुप्रीम कोर्ट पुराव्याच्या आधारे निर्णय करेल’, असं म्हणत परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेमध्ये अनिल देशमुख यांनी 100 कोटी गोळा करण्याचे सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही – शरद पवार

‘अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू आहे. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचे जे पत्र लिहिले होते. त्यामुळे सचिन वाझेंना भेटायला बोलावलं असा दावा करण्यात आला आहे. पण त्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला देशमुख हे रुग्णालयात दाखल होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत. त्यानंतर 27 फेब्रुवारीपर्यंत ते क्वारंटाइन होते. त्याच दिवशी ते वाझे यांना भेटले असल्याचा दावा करण्यात आला होता. जेव्हा चौकशी होईल तेव्हा सत्य बाहेर येईल, असं पवार स्पष्ट केले.

जे काही आरोप झाले त्यामध्ये मुख्य प्रकरण काय आहे. कोणाच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्यात आले हे प्रकरण आहे. माजी पोलीस आयुक्ताला हे सर्व माहीत होते तर एक महिने का शांत होते, मायकल रोडवर स्फोटकं कुणी ठेवली, मनसुख हिरेन यांची हत्या कुणी केली, याचा तपास झाला पाहिजे.  या सर्व चौकशीला विचलित करण्यासाठी हे सर्व प्रकार विरोधक करीत आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *