माझं करिअर उद्धवस्त झालं

मनोरंजन

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने बेधडकपणे कलाविश्वातील घराणेशाहीवर व्यक्त झाली असून तिने दिग्दर्शक करण जोहर,महेश भट्ट यासारख्या दिग्गजांवर घराणेशाहीचे आरोप केले आहेत. तिच्या या आरोपानंतर अनेका कलाकारांनी कंगनाची बाजू घेत त्यांना आलेल्या घराणेशाहीचे अनुभव सांगितले आहेत. यामध्येच अभिनेत्री सिमी गरेवाल यांनीदेखील त्यांना आलेल्या अनुभवाचं कथन करत कंगनाला पाठिंबा दिला आहे.
सिमी गरेवाल यांनी ट्विट करत एका दिग्गज व्यक्तीमुळे माझं करिअर उद्धवस्त झालं असं त्यांनी सांगितलं आहे. सोबतच त्यांनी कंगनाला पाठिंबा दिला असून तिचं कौतुकही केलं आहे.
मला कंगनाचं खरंच कौतुक करावसं वाटतं. ती माझ्यापेक्षा फार धाडसी आहे. हे केवळ मलाच माहित आहे की एका दिग्गज व्यक्तीने माझं करिअर उद्धवस्त करण्याचा कसा प्रयत्न केला. मी गप्प राहिले, कारण माझ्यात तेवढी निडरता नव्हती, जितकी कंगनामध्ये आहे, असं ट्विट सिमी गरेवाल यांनी केलं.
दरम्यान, कंगनान बॉलिवूडमधील घराणेशाहीविरुद्ध आवाज उठविल्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. अनेक कलाकारांनी कंगनाला पाठिंबा देत त्यांना आलेला घराणेशाहीचा अनुभव शेअर केला आहे. यात सिमी गरेवालदेखील आहेत. सिमी गरेवाल या लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ङ्गदो बदनङ्ख, ङ्गसाथीङ्ख, ङ्गमेरा नाम जोकरङ्ख, ङ्गसिद्धार्थङ्ख, ङ्गकर्जङ्ख आणि ङ्गउडीकानङ्ख या चित्रपटांमध्ये झळकल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *