सोलापूर (प्रतिनिधी) स्मार्ट सिटीच्या गलथान कारभारामुळे उघड्या डीपीच्या विजेचा शॉक लागून पाच वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे.पूर्वा अलकुंटे असं विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.पांजरापोळ ते बाळीवेस दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू आहे.वडर गल्ली जवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या डीपीमूळे पूर्वाला विजेचा शॉक बसला.दरम्यान या ठिकाणी नागरिकांनी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.तर पूर्वाल उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असता, उपचारापूर्वीच मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.यावेळी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा महापालिका विरोधी पक्ष नेते अमोल बापू शिंदे यांनी स्मार्ट सिटीच्या गलथान कारभार या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली.संबंधित कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.सोलापूर शासकीय रुग्णालयात पूर्वाच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती.या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत करण्यात आली असून,पुढील तपास फौजदार चावडी पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here