…अखेर शिल्पा शेट्टी घराबाहेर पडली, एका महिन्यानंतर शुटिंगला लावली हजेरी

0
237

पॉर्नोग्राफी प्रकरणात पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर तब्बल महिन्याभराने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अखेर सर्वांसमोर आली आहे. डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर’च्या सेटबाहेर शिल्पा शेट्टी दिसली आहे. तब्बल महिनाभरानंतर शिल्पा शेट्टी अशापक्रारे सार्वजनिक ठिकाणी दिसील आहे. शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर’ शो जज करत असून सेटवरील तिचे व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. या शोमध्ये शिल्पासोबत अनुराग बासू आणि गीता कपूरदेखील जज आहे. राज कुंद्रामुळे काही काळासाठी शिल्पा शेट्टीला शोमधून एक्झिट घ्यावी लागली होती.

गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांकडून राज कुंद्राला अटक करण्यात आली. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांना संशय असून तपास सुरु आहे. पॉर्नची निर्मिती आणि ते अॅपवरुन प्रसिद्धी करण्याचा राज कुंद्रावर आरोप आहे. राज कुंद्राविरोधात आपल्याकडे बरेचसे पुरावे असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तसंच यामध्ये शिल्पा शेट्टीची कोणतीही भूमिका नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.शिल्पा शेट्टीने २००९ मध्ये व्यावसायिक राज कुंद्रासोबत लग्न केलं. कामाच्या बाबतीत बोलायचं गेल्यास शिल्पा शेट्टीचा नुकताच हंगामा २ चित्रपट रिलीज झाला. राज कुंद्राचं प्रकरण ताजं असतानाच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यावेळी शिल्पा शेट्टीने एक या चित्रपटामागे खूप मेहनत असल्याचं सांगत चाहत्यांना पाहण्याचं आवाहन केलं होतं. राज कुंद्रा प्रकरणाचा चित्रपटावर परिणाम होऊ नये यासाठी शिल्पा शेट्टीने हा प्रयत्न केला होता.