क्रिकेटपटूंच्या पत्नीही ड्रग्जचं सेवन करतात; शर्लिन चोप्राचे गंभीर आरोप

ताज्या घडामोडी मनोरंजन मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रानं बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. एबीपी न्यूजशी बोलताना शर्लिननं दावा केला आहे की, मोठे क्रिकेटर्स आणि सुपरस्टार्स यांच्या पत्नी ड्रग्ज घेतात. कोलकाता नाईट रायडर्सच्या अफ्टर मॅच पार्टीमध्ये क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नी वॉशरूममध्ये ड्रग्ज घेत असल्याचा दावा शर्लिननं केला आहे.

एबीपी न्यूजशी बोलताना शर्लिन म्हणाली की, त्या पार्टीत कोलकाता नाईट राइडर्स टीमचे क्रिकेटर्स होते, त्यांच्या बायका होत्या. वर्कर्स आणि टीमचे मालक तसंच त्यांचे काही सुपरस्टार मित्र देखील होते. मी ज्यावेळी तिथं बाथरूममध्ये गेले त्यावेळी त्यांच्या बायका व्हाईट पावडर स्मोक करत होत्या. मी काही जेंट्स बाथरुममध्ये जाऊ शकली नाही. तिथं गेले असते तर तिथं वेगळंच दृश्य पाहायला मिळालं असतं.

शर्लिन चोप्रा म्हणाली की, या गोष्टी बाहेरच्या लोकांसाठी शौकिन वगेरे असतील मात्र बॉलिवूडमध्ये सर्वांना माहितीय कोण-कोण कोकेन अॅडिक्टर्स आहेत. तसंच कोण लोकं ड्रग्ज घेतल्याशिवाय काम करु शकत नाहीत.

शर्लिन म्हणाली, मी त्या पार्टीत कुणाकुणाला पाहिलं हे मला चांगलंच ठाऊक आहे. वेळ आल्यावर सर्व सांगणार आहे. ही बाब लपवण्याचं काही कारण नाही. मला वाटतं या ड्रग्ज साखळीचा पूर्ण छडा आधी लागावा. सर्व सप्लायर्स, डीलर्स यांची नावं आधी बाहेर यावीत. यानंतर हिंदी फिल्म इंडस्ट्री स्वच्छ होईल, असं ती म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *