इंगोले वस्ती आदर्श शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन घेऊ लागले

ताज्या घडामोडी सोलापूर

जनसत्य, बालाजी शेळके

 मोहोळ

कोरोना नंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न लक्षात घेऊन इयत्ता पाचवी ते पुढील शिक्षण शासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. मात्र इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची प्राथमिक शाळा अजूनही सुरू झाली नसल्याच्या पार्श्वभूमीवर इंगोले वस्ती, खंडाळी (ता. मोहोळ) या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा दृष्टीने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शैक्षणिक अभ्यास घेण्यावर भर दिला असून या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
इंगोले वस्ती खंडाळी (ता. मोहोळ) जिल्हा परिषद शाळा ही मोहोळ तालुक्यात आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेचे उपक्रमशील शिक्षक रवी चव्हाण, मुख्याध्यापक आबासाहेब टेकळे, शिक्षक सागर भडोळे यांनी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची शाळा अजूनही सुरू करण्यास परवानगी नसल्या कारणामुळे तसेच विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांचा शैक्षणिक अभ्यास घेण्याच्या स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. इयत्ता तिसरी व चौथी च्या मुलांना मोबाईल हाताळणे सोयीचे असल्यामुळे त्यांचा अभ्यास गूगल मीट द्वारे घेण्यात येत होता. मात्र पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यास करायला देणे अडचणीचे ठरत होते. म्हणून इंगोले वस्ती शाळेच्या शिक्षकांनी त्यांना घरी जाऊन अभ्यास देऊन तसेच त्यांना चॉकलेट, बिस्किट, खाऊ देऊन त्यांच्या अभ्यासाचा आढावा घेतला आहे. 

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
….लवकरच शाळा चिमण्यांनी गजबजून जाईल.

शाळा बंद कालावधीत विद्यार्थी, गृहभेटी मुळे  शाळेपासून दूर दूर असलेल्या वस्तीवर जाऊन विद्यार्थी-पालकांशी अभ्यास बाबत साधारण चर्चा करता आली, घरी अचानक दिसल्यावर काही विद्यार्थी आनंदित व्हायचे, काहीजण लाजून घरातच थांबायचे, काहीजण तर पळूनच जातात असा अनुभव येत आहे, यावेळी सर्वांना चॉकलेट मिळाल्यावर खुश होतात. एकंदरीत अभ्यास समाधान कारक सुरू आहे, गृहभेटी मुळे पालक अजून लक्ष देऊ लागले आहेत. आतापर्यंत ७५ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन  शैक्षणिक आढावा घेतला आहे. एकंदरीत सर्वांनाच शाळेची ओढ लागून राहिली आहे. कोरोना मुळे ग्रामीण भागातील मुलांच्या अभ्यासावर परिणाम झालेला दिसून येत आहे. पण लवकरच १ ते ४ ची शाळा देखील आता लवकर सुरू होईल आणि शाळा चिमण्यांनी गजबजून जाईल.
-रवी चव्हाणउपक्रमशील शिक्षक

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *