शरद पवार म्हणजे चार खासदारांचे लोकनेते, आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका

ताज्या घडामोडी सांगली

सांगली : राष्ट्रवादीचे 4 खासदार आहेत आणि शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत. जर 4 खासदार असणाऱ्या पार्टीच्या प्रमुखांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लोकनेते म्हणत असतील तर 303 खासदार असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाला राष्ट्रवादीचे कार्यकर्तेनी काय म्हटलं पाहिजे, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीला सवाल केला. सांगलीतील खरे क्लब येथे पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी सांगली शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी कार्यकर्ता बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना पडळकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्रातील भाजपा नेतृत्ववर टीका करण्यात येते. शरद पवार हे केवळ चार खासदारांचे लोकनेते असल्याची टीका पडळकरांनी केली आहे. चार खासदार असणारे जर लोकनेते होत असतील, तर 303 खासदार असणाऱ्या मोदीच्या नेतृत्वला काय म्हटले पाहिजे, असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला. विश्वासघाताने सत्तेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र आमची जहागीर आहे, आम्हाला कोण अडवणार नाही,असा गैरसमज झाला आहे, असा टोला पडळकरांनी लगावला.

गोपीचंद पडळकरांनी स्वत:ची पातळी बघावी : अमोल मिटकरी

शरद पवारांबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांनी स्वत:ची पातळी बघावी अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली. 303 खासदारांचे नेते म्हणून ज्यांची ते शिफारस करत आहेत त्यांचे गुरु बारामतीत बसतात. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्रातली जनता जशास तसं उत्तर देईन, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं.

शरद पवार कुठे आणि पडळकर कुठे : अनिल परब

शरद पवार कुठे, त्यांचं कर्तृत्व कुठे आणि पडळकर कुठे. कोणावरही टीका करण्याआधी स्वतःकडे पहावं. शरद पवारांनी वयाच्या 36 व्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती, असं अनिल परब यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *