पुणे : पंढरपूरचेराष्ट्रवादीचे लोकप्रिय राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय भारत भालके यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांची 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, त्यानंतर पाच दिवसांनी 4 नोव्हेंबर रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ते घरी सुद्धा आले होते. पण काही दिवसांनी पुन्हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना मागील आठवड्यात पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, गुरुवारपासून त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यांना किडनीचा आजार आणि मधुमेहाचा त्रास आहे.
भारत भालके यांची प्रकृती खालावल्यामुळे कार्यकर्ते चिंतातूर झाले आहे. भालके यांच्या दिर्घायुष्यासाठी कुटुंबीयांनी आज सकाळी विठ्ठलाला साकडे घातले. सोशल मिडियावर त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्येमुळे उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ‘भालके उपचारांना प्रतिसाद देत असून लवकरच ते बरे व्हावे’, यासाठी त्यांचे बंधू पंजाबराव भालके यांनी विठ्ठल-रुक्मिणीला साकडं घातले आहे.
दरम्यान, ‘आमदार भारत भालके यांची प्रकती अतिशय नाजूक आहे, पोस्ट कोविड त्रासांमुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आहे. आम्ही लक्ष ठेऊन आहोत’, अशी माहिती रूबी हॉस्पिटलचे डॉक्टर परवेझ ग्रँट यांनी दिली.