विवाहितीने १ लाख ५० हजार रुपये व सोन्याचे दागिने घेऊन निघून गेल्या

ताज्या घडामोडी सोलापूर

जनसत्य, प्रतिनिधी

मोहोळ,
केवळ तेरा दिवसापूर्वी लग्न झालेल्या नरखेड (ता. मोहोळ) येथील विवाहितेने काहीही न सांगता घरातील रोख रक्कम १ लाख ५० हजार रुपये व स्वतःकडे असलेले सोन्याचे दागिने घेऊन निघून गेल्याने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पतीने मोहोळ पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
याबाबत म्हणून पोलिसांनी दिलेली अधिक माहितीनुसार, नरखेड (ता. मोहोळ) येथील सोमनाथ नागनाथ मोटे (वय-३२) यांचे नंदुरबार जिल्ह्यातील दत्ता बुरकुले यांच्या लक्ष्मी (वय-२१) या मुलीशी दि. १३ मार्च २०२१ रोजी अत्यंत साध्या पद्धतीने नरखेड येथील महादेव मंदिरा मध्ये लग्न झाले होते. लक्ष्मी सोबत तिची बहीण ललिता डोंगरे (रा. सावरखेडा जि. हिंगोली) ही पाठराखीण म्हणून राहिली होती. लग्नामध्ये सोमनाथ मोटे यांनी नववधू लक्ष्मी हिला एक तोळ्याचे गंठण, एक तोळ्याची कर्णफुले, अर्ध्या तोळ्याची बोरमाळ असे सोन्याचे दागिने घेतले होते. दरम्यान १८ मार्च रोजी सोळक्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर लक्ष्मीची बहीण ललिता डोंगरे ही तिच्या गावी निघून गेली. दरम्यान २५ मार्च रोजी सोमनाथ मोटे हे स्वतःची चार चाकी गाडी घेऊन बुद्रुकवाडी (ता. माढा) येथे कामानिमित्त गेले असता त्यांची पत्नी लक्ष्मी हिने दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घरातील सर्वजण झोपी गेल्याचे पाहून कोणाला काहीही न सांगता घरामध्ये ठेवलेले १ लाख ५० हजार रुपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल तसेच लग्नामध्ये घातलेले सर्व सोन्याचे दागिने घेऊन निघून गेल्याचे समजले. त्यानुसार सासरच्या लोकांनी आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली. मात्र ती मिळून आली नाही. म्हणून पती सोमनाथ मोटे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश पोफळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *