केंद्राने तयार केल्या गाइडलाइन्स; शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यांवर

ताज्या घडामोडी देशविदेश

दिल्ली : केंद्र सरकारने अनलॉक 4 (Unlock – 4) ची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मॉल खुले करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी अनेक प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यातच गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा बंद आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या गाइडलाइन्समध्ये शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे

केंद्र सरकारने यासाठी गाइडलाइन्स (Unlock 4 Guidelines for Schools)  तयार केल्या आहेत. यावर सचिवांची टीम आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी चर्चा केली आहे. सांगितले जात आहे की, अंतिम अनलॉक गाइडलाइन्सदरम्यान याबाबत माहिती देण्यात आली आहे.

काही राज्यांमध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्याची योजना तयारी करीत आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारांना या योजनेबाबत मुलांच्या पालकांचं समर्थन मिळत नाही. बैठकीचा भाग असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी आहे, त्यांनी सीनिअर वर्ग सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आंध्रप्रदेशात 5 सप्टेंबरपासून सुरू होणार शाळा?

यादरम्यान आंध्रप्रदेशसह काही राज्यात 1 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या गाइडलाइन्समध्ये शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे. आंध्र सरकारने शाळा सुरू करण्याच्या बातमीवर अनेक पालकांनी विरोध केला आहे. वायएस जगनमोहन रेड्डी सरकार 5 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *