‘या’ राज्यात पहिली ते आठवी 31 मार्चपर्यंत शाळा बंद, 10-12वी बोर्ड परीक्षा होणार

ताज्या घडामोडी देशविदेश

भोपाळ : रिकव्हरी रेट वाढता असला तरी नवीन रुग्णांची लागण होण्याचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय लहान मुलांना कोरोनाचा धोका जास्त आहे. महाराष्ट्रात मुंबई वगळता अनेक ग्रामीण भागांमध्ये 8 ते 12 वी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तर मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत असे सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे भाजप सरकारनं कोरोनातील परिस्थितीचा आढावा घेऊन मोठा निर्णय घेतला आहे.

मध्य प्रदेशातील पहिली ते इयत्ता 8 पर्यंत शाळा मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवाराज सिंह चौहान यांनी घेतला आहे. पाचवी ते आठवीपर्यंत शाळा बंद राहणार असून इयत्ता 10 वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा मात्र होणार आहे. मध्य प्रदेशात कोरोनामुळे 30 मार्च 2021 पर्यंत शाळा सुरू होणार नाहीत असे सरकारने जाहीर केले आहे. परंतु यावेळी, दहावी व दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांचे नियमित वर्ग आता घेण्यात येणार आहेत.मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. त्यामध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी शाळा न उघडण्याचे निर्देश दिले. तर 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा मात्र होणार असल्याचं सांगितलं आहे.

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत, त्यामुळे आता त्यांच्याकडे नियमित वर्ग असतील. शिक्षणाची पातळी सुधारण्यासाठी खासगी शाळांच्या धर्तीवर सरकारी शाळांमध्ये केजी वर्ग सुरू केला जाईल आणि 1500 सरकारी शाळांमध्ये केजी 1 आणि केजी 2 सुरू करण्यात येईल. तर उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल अशी देखील माहिती बैठकीदरम्यान मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात काय आहे स्थिती?

महाराष्ट्रात ग्रामीण भागांमध्ये 8 ते 12 शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यात आली आहे. एक दिवस आड कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तर मुंबईत अजूनही शाळा बंद आहेत. 31 डिसेंबरनंतर मुंबईत शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *