व्याजाचा तगादा लावत अपहरणएका सावकारस अटक; बापलेक फरार

क्राईम सोलापूर

सोलापूर (प्रतिनिधी) कर्जाची रक्कम फेडूनही आणखी दोन लाखांसाठी तगादा लावत एकाचे अपहरण केल्याप्रकरणी तिघा सावकारांवर एकास  फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तर दोघे फरार झाले आहेत.प्रकाश घोडके (रा. गडदर्शन सोसायटी,दमाणी नगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे तर त्याचे वडील सदाशिव आणि भाऊ गोपीनाथ हे फरार झाले आहेत.   याबाबत शितल वाईकर (रा.मुरारजी) याने फिर्याद दिली होती.शितलसह तिघांनी सावकारीचा धंदा करणार्‍या घोडके बापलेकांकडून सुमारे दहा लाख ७ टक्के व्याजाने घेतले होते.यातील ९ लाख रूपये आणि दोन एकर जमिन देऊनही उर्वरित पैशासाठी ते शितलला त्रास देत होते.यासाठी त्याचे अपहरणही केले होते.या त्रासामुळे शितल वाईकर याने ङ्गौजदार चावडी पोलिसात घोडके बापलेकांविरूद्ध तक्रार दिली होती.दरम्यान,बुधवारी फौजदार चावडी पोलिसांनी प्रकाश घोडके यास अटक केली असून त्याचे वडील आणि मोठा भाऊ गोपीनाथ फरार झाले आहेत.दरम्यान,घोडके परिवाराची पंढरपूर,तिर्‍हे येथे मोठी शेती असल्याचे कळते.याशिवाय प्रकाश याचे काका पोलिस असल्याची माहिती समोर आली आहे

उर्वरित दोघांना लवकरच अटक करूः देशमाने
याप्रकरणी प्रकाश घोडके याला मरिआई चौकातून अटक केली असून त्याचे वडील आणि भावालाही लवकरच अटक करू,असे फौजदार चावडीचे स.पो.नि.सोमनाथ देशमाने यांनी दैनिक ‘जनसत्य’शी बोलताना सांगितले.Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *