सावकार नगरसेवक जाधवसह दशरथ कसबेला अटक

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर


अमोल जगताप आत्महत्या प्रकरणी

सोलापूर, (प्रतिनिधी):- पत्नी, दोन मुलांचा खून करून आत्महत्या करणार्‍या अमोल जगताप याला व्याजाने पैसे देणारे नगरसेवक लक्ष्मण यल्लप्पा जाधव ऊर्फ काका (वय 63, रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी नं.3, सोलापूर) व दशरथ मधुकर कसबे (वय 45, रा. मुकुंद नगर, भवानी पेठ, सोलापूर) दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली. ही कारवाई बुधवार दि. 22 जुलै रोजी झाली.ङ्मा कारवाईङ्कुळे आता ङ्मा प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
जुना पुणे नाका हांडे प्लॉट येथे राहात असलेला अमोल अशोक जगताप हा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी येथे गॅले्नसी नावाचे हॉटेल चालवत होता. व्यावसायासाठी त्याने अनेकाकडून व्याजाने पैसे घेतले होते परंतु व्यवसायामध्ये नुकसान होत होते त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या अमोल जगताप याने राहात असलेल्या घरात येवून त्याची पत्नी मयुरी, आदित्य आणि आयुष या दोन मुलांना गळफास देवून त्यांचा खून केला आणि स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये त्याने कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले आणि काही खाजगी सावकारांचे नावे लिहून ठेवले होते. याबाबत अमोल चा भाऊ राहूल जगताप याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी तपास करीत व्यंकटेश दंबडदिन्नी (वय 41, रा. मार्केट यार्ड समोर हैदराबाद रोड सोलापूर) याला अटक केले होेते.
त्यानंतर या गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सिध्दाराम मलप्पा बिराजदार (वय 42, रा. वारद चाळ, रामलाल चौक, सोलापूर), दिनेशकुमार ऊर्फ बंडू दिलीप बिराजदार (वय 28, रा. वारद चाळ आणि दमाणी नगर सोलापूर) या दोन खाजगी सावकारांना अटक केली. यांनी अमोल जगताप याला 15 लाख रूपङ्मे 15 ट्नयाने देवून त्याच्याकडून शेतजमीन लिहून घेतल्याचे उघड झाले होते. वरील आरोपींनी ज्यांना व्याजाने पैसे दिले आहेत आणि त्यांच्याकडून व्याज व मुद्दलसाठी त्रास दिला जात आहे त्यांनी शहर गुन्हे शाखेकडे तक्रार द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले

मोटारसायकलवरून पळून जात असताना जाधवला धुळखेड येथेपकडले
दरम्यान या गुन्ह्यात नगरसेवक लक्ष्मण जाधव यांच्यासह अनेकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीसांनी नगरसेवक लक्ष्मण जाधव याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले परंतु लक्ष्मण जाधव याला याची खबर लागताच तो सोलापूर सोडून पळून जात होता. विजापूरकडे लक्ष्मण जाधव हा जाणार असल्याचे समजल्यावर शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि त्यांचे पोलीस पथक मंगळवार दि. 21 जुलै रोजी दिवसभर विजापूर रोड 13 मैल येथे सापळा लावले परंतु तो तेथून निसटला त्यानंतर तो कर्नाटकातील धुळखेड येथे एम एच 13 बी पी 2830 या मोटारसायकलवरून पळून जात असताना त्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडेकर यांनी ताब्यात घेवून झळकी पोलीस ठाण्यात नोंद करून सोलापूरला अटक करून आणले. लक्ष्मण जाधव याने मोठ्याप्रमाणात व्याजाने पैसे अमोल जगताप याला दिले असल्याचे उघड झाले आहे.
दशरथ कसबेनेही व्याजाने पैसे दिले
एमपीडीए मध्ये तुरूंगात जावून आलेला दशरथ कसबे याचेही नाव या प्रकरणात असल्याने पोलीसांनी त्यालाही अटक केली आहे. त्यानेही मोठ्याप्रमाणात व्याजाने पैसे दिल्याचे उघड झाले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली. त्ङ्माच्ङ्माकडे तपास सुरू असल्ङ्माचे सांगण्ङ्मात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *