तुम्ही टप्प्यात आल्यावर तर टिपता , पण मी खानदानी शिकारी आहे.. मी बगलला काढून टिपतो : आमदार संजयमामा शिंदे

ताज्या घडामोडी सोलापूर

.
कन्हेरगांव (धनंजय मोरे) : साहेब तुम्ही टप्प्यात आल्यावर टिपता… जयंत पाटील साहेब असुद्या किंवा मोठे साहेब असू द्या टप्प्यात आल्यानंतर तुम्ही टिपता.. मी कसा आहे साहेब खानदानी शिकारी आहे , मी बगलला काढून टिपतो , अशी गर्जना करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात केली .पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला . याप्रसंगी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे बोलत होते.         याप्रसंगी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, ही निवडणूक धनशक्ती आणि लोकशक्ती अशा दोन टोकांची ही निवडणूक आहे .जिल्ह्यातील परिस्थिती अशी आहे की, गेले अनेक वर्ष प्रस्थापितांच्या विरोधात लढत असताना जिल्ह्यात अनेकांच्या ओळखी झाल्या, मैत्री झाली, परंतु माझा स्वभाव असा आहे की मैत्री आणि राजकारण हे वेगवेगळे आहे .जसं भारत नानांचं होतं, नाना कुठल्याही पक्षात असले, कुठेही असले, तरी नानांचे नेते पवार साहेब होते .माझंही तसंच आहे, मी कुठेही असू द्या, माझे नेते हे अजितदादा च असतील. स्वर्गीय भारत नाना भालके यांचे माझ्यावर उपकार होते ,याची जाणीव ठेवून मी निर्णय घेतला आहे ,भगीरथ भालके यांच्या पाठीशी तन-मन-धनाने खंबीर पणाने पाठीशी उभा राहून 17 तारखेपर्यंत मी पंढरपूर भागात तळ ठोकून राहणार आहे. जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडीत काम करताना माझा आणि दुसऱ्या नेत्यांच्या काम करण्याचा फरक वेगळ आहे. निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातील नेतेमंडळी ‘ गबाळ ‘ किती आहे , हे बघून निर्णय घेतात. पण मी .. ‘ अडचणीत ‘ किती आहे हे बघून निर्णय घेतो. माझी भूमिका हीच असते की अडचणीतल्या माणसाला नेहमी सहकार्य करण्याची भूमिका असते, मंग ह्याच्यावरून लक्षात घ्या कि समाधान आवताडे यांची निवड उमेदवारी कशावरून केली असावी आणि त्याचा अनुभव विचारायचा असेल तर आपल्या माळशिरस तालुक्याचे स्वर्गीय आमदार हनुमंत डोळस यांच्या मुलाला विचारा .त्यामुळे तुम्ही निश्चित राहा मी तन-मन-धनाने भगीरथ च्या पाठीशी आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून तीच परिस्थिती या निवडणुकीत करायचे आहे.

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *