आष्टे येथील सीना नदीच्या पात्रामध्ये अवैधरीत्या वाळूचा उपसा, ३५ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

क्राईम ताज्या घडामोडी सोलापूर

जनसत्य, प्रतिनिधी

मोहोळ,
मोहोळ तालुक्यातील आष्टे येथील सीना नदीच्या पात्रामध्ये अवैधरीत्या वाळूचा उपसा करत असताना सोलापूर ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेदोन ठिकाणी धाड टाकून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल करीत तब्बल ३५ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना दि. २६ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या मोठ्या कारवाईमुळे मोहोळ तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीच्या पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने मोहोळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
 याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण च्या पथकातील पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मोहोळ तालुक्यातील आष्टे येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विनापरवाना वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार इसाक मुजावर, पोलीस हेडकॉन्स्टेबल धनाजी गाडे, मोहन मनसावले, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय दळवी, धनराज गायकवाड, समीर शेख यांच्या पथकाला मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या आष्टे येथे येथे पाठवले असता त्याठिकाणी अवैधरित्या विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.  यामध्ये एम एच २४ डी ३८८२, एम एच १४ एफ २९४१, एम एच ११ ए ५५३४, एक टेम्पो ट्रक नंबर नसलेला, एक यारी काढण्याचे मशीन एम एच ०४ बी यु ९५४७, एम एच ०८ एच ३१६९, तर पळून गेलेला टेम्पो ट्रक एम एच ४२ बी ८३८५ यासह एकूणवाळू पाॅईंटच्या ठिकाणाहून १ ट्रॅक्टर, यारी मशिन संच, ०५ हॅड्रोलिक टेम्पोट्रक असे एकूण ३५ लाख ३ हजार २०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पहिल्या कारवाई मध्ये संतोष ब्रम्हदेव आरकिले रा. शेगांव दुमाला ता. पंढरपूर, समीर लक्ष्मण माशाळ, रा. आष्टे  ता. मोहोेळ, रामचंद्र अर्जून नरोटे, रा.आष्टे ता. मोहोळ समाधान शेकप्पा शिवशरण, आप्पा श्रीरंग मोरे, रा. नजीकपिंपरी ता. मोहोळ, दिनकर अंबादास वाघमोडे, रा. नजीकपिंपरी ता. मोहोळ, विलास हुकूम वाघमोडे या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व त्यांच्याकडूनवाहने, यारी, वाळू, लोखंडी प्लेट असा एकूण २० लाख १७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यानंतर पोलीस कर्मचार्‍यांचे पथक जवळच असलेल्या वाळू साठ्यावर गेले असता इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सदाशिव महादेव वाघमोडेे, पोपट शिवाजी वाघमोडे, बजरंग शिवाजी मोरे, उत्तम बलभिम वाघमोडे सर्व रा. नजीक पिंपरी ता. मोहोळ, दत्तात्रय प्रल्हाद चव्हरे  रा. मोहोळ, या पाच जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून वाहने, वाळू, व इतर साहित्य असे मिळून १४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वरील बारा जणांसह बापू खरात रा. आष्टे  ता. मोहोळ, राहूल खरात, वाहन मालक अच्युत गायकवाड रा. मोहोळ, सिकंदर धोत्रे रा. मोहोळ, दीपक बाळासाहेब झेंडगे रा. मलकाची हिंगणी ता. मोहोळ या पाच जणांसह दोन कारवायांमध्ये एकूण १७ जणांवर संगणमत करून पर्यावरणाचा ऱ्हास होईल हे माहित असताना देखील महसूल विभागाचा परवाना अथवा रॉयल्टी नसताना सीना नदीच्या पात्रातून वाळू काढून त्याचा साठा करून ती चोरून विक्री करत असल्या प्रकरणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल नारायण गोलेकर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार पितांबर शिंदे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *